TRENDING:

Mangaladitya Rajyoga 2026: सिंह, धनुसहित या राशीचे भाग्य चमकणार! मंगळादित्य राजयोगात चांदी, संयम ठेवल्याचं शुभफळ

Last Updated:
April Astrology: सध्या मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून लवकरच एप्रिल महिन्याची सुरुवात होत आहे. एप्रिल महिन्यात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची अनोखी स्थिती पाहायला मिळत आहे. दोन प्रमुख ग्रह एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा विशेष योग तयार होतात, त्याचा राशीचक्रावर थेट परिणाम होतो. असाच एक विशेष योग म्हणजे मंगळादित्य राजयोग.
advertisement
1/6
सिंह, धनुसहित या राशीचे भाग्य चमकणार! मंगळादित्य राजयोगात चांदी, संयम ठेवल्याचं शुभफळ
मंगळादित्य राजयोग सूर्य आणि मंगळाच्या संयोगाने तयार होतो. द्रिक पंचांगानुसार, हा राजयोग दिनांक 2 एप्रिलपासून मीन राशीत सूर्य आणि मंगळाच्या संयोगाने तयार होईल. जवळपास 18 महिन्यांनंतर तयार होणारा हा योग काही विशिष्ट राशींसाठी विशेष शुभ मानला जातोय.
advertisement
2/6
मंगळादित्य राजयोग म्हणजे - ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. तो आत्मविश्वास, आदर, नेतृत्व आणि प्रशासन यांच्याशी संबंधित ग्रह मानला जातो. मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते, तो धैर्य, ऊर्जा, भूमी आणि शौर्य यांचे प्रतिक आहे. अग्नी तत्त्वाचे हे दोन शक्तिशाली ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा मंगळादित्य राजयोग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतो आणि जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो.
advertisement
3/6
मेष - हा राजयोग मेष राशीसाठी अनेक प्रकारे फायद्याचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, कठोर परिश्रमातून सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन संधी आणि उत्पन्नाचे वाढीव स्रोत मिळू शकतात. आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेले प्रकल्प हळूहळू पूर्ण होऊ लागतील. पण, या काळात खर्चही वाढू शकतो, त्यामुळे आपल्या आर्थिक बाबींचे नियोजन करणे उत्तम राहील.
advertisement
4/6
सिंह - हा योग सिंह राशीसाठी देखील फायदेशीर मानला जातोय. या काळात पदोन्नती किंवा नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित कामातही यश मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. फक्त कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
5/6
धनु - हा राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायात प्रगती घडवून आणू शकतो. नवीन योजना यशस्वी होऊ शकतात आणि विस्ताराच्या संधी निर्माण होऊ शकतात. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा प्लॅन आखला जाऊ शकतो.
advertisement
6/6
हा काळ विद्यार्थ्यांसाठीही अनुकूल असू शकतो, धनु राशीच्या लोकांना त्याचे चांगले परिणाम मिळूशकतात. पण, कुटुंबातील आईच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mangaladitya Rajyoga 2026: सिंह, धनुसहित या राशीचे भाग्य चमकणार! मंगळादित्य राजयोगात चांदी, संयम ठेवल्याचं शुभफळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल