TRENDING:

आईचं निधन, मनोरुग्ण तरुणीसह वडील रस्त्यावर, ‘त्या’ तिघांनी निर्णय घेतला अन् आयुष्य बदललं

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: तरुणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालल्याने सिंधी समाज मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : शहराच्या गजबजाटात कुणाला कुणासाठी वेळ नसतो, असं म्हटलं जातं. पण, छत्रपती संभाजीनगरात माणुसकीला नवी उंची देणारी घटना घडली आहे. मागील सहा महिन्यांपासून वडिलांसोबत बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या एका मनोरुग्ण तरुणीचं आयुष्य बदललं आहे. स्थानिक पोलीस, ‘माणुसकी’ या सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते आणि सिंधी समाज मंदिर ट्रस्ट यांनी पुढाकार घेत तिच्या उपचारांसह सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.
आईचं निधन, मनोरुग्ण तरुणीसह वडील रस्त्यावर, ‘त्या’ तिघांनी निर्णय घेतला अन् आयुष्य बदललं
आईचं निधन, मनोरुग्ण तरुणीसह वडील रस्त्यावर, ‘त्या’ तिघांनी निर्णय घेतला अन् आयुष्य बदललं
advertisement

‎आईच्या निधनानंतर मानसिक आजाराशी झुंज देणारी ही तरुणी आणि तिचे वृद्ध वडील दोघेही रस्त्यावर आले होते. वडिलांनाही मानसिक समस्या आणि व्यसनामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. मंदिर परिसरात त्यांचा मुक्काम असायचा. परिसरातील काही नागरिक त्यांना अन्न देत असले तरी अस्वच्छतेमुळे आणि त्यांच्या हालअपेष्टांमुळे परिसरातील वातावरणही असह्य झाले होते.

तृतीयपंथी नेमकं कोण? ‘त्या’ विधेयकानं वातावरण तापलं, LGBTQ समुदाय रस्त्यावर, का होतोय विरोध, Video

advertisement

‎तरुणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालल्याने सिंधी समाज मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन कुंभार यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत ‘सु-लक्ष्मी’ सेवाभावी संस्थेशी संपर्क साधला.

View More

‎माणुसकी वृद्ध सेवालयाचे सुमित पंडित आणि पूजा पंडित यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोघांची परिस्थिती समजून घेत जबाबदारी स्वीकारली आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर तरुणीच्या मानसिक आजारावर उपचार सुरू केले. सध्या तिला तात्पुरत्या निवाऱ्यासाठी सेवालयात ठेवण्यात आले असून पुढील पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तृतीयपंथी नेमकं कोण? ‘त्या’ विधेयकानं वातावरण तापलं, LGBTQ समुदाय रस्त्यावर, का होतोय विरोध, Video
सर्व पहा

दरम्यान, ‎या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे. योग्य वेळी पुढे सरसावलेल्या हातांमुळे एका असहाय तरुणीला केवळ उपचारच नव्हे, तर जगण्याची नवी संधी मिळाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आईचं निधन, मनोरुग्ण तरुणीसह वडील रस्त्यावर, ‘त्या’ तिघांनी निर्णय घेतला अन् आयुष्य बदललं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल