'ती फक्त पैशांसाठी चीचीसोबत...' मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, सुनिताचा शॉकिंग खुलासा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या अनेक चर्चा सुरू आहेत. दरम्यान गोविंदाची बायको सुनिताने यावर खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
advertisement
1/8

अभिनेता गोविंदा आणि त्याची बायको सुनिता अहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. गोविंदाच्या कथित अफेअरवर त्याची पत्नी सुनिता अनेकदा अनेक विधानं करताना दिसतेय. गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. पुरावा मिळाल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही असं गोविंदाची बायको याआधी म्हणाली होती. दरम्यान गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत असलेल्या अफेअरबाबत सुनितानं मोठं वक्तव्य केलं आहे. हे ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
2/8
गोविंदाच्या अफेअरबरोबरच सुनितानं तिच्या नव्या वर्षाचा प्लानही सांगितला. नवीन वर्ष तिच्या कुटुंबासाठी आनंद घेऊन येईल अशी तिला अपेक्षा आहे. इतकंच नाही तर एका पुरुषाने त्याची आई, बायको आणि मुलीशिवाय कोणत्याच महिलेशी संबंध ठेवून नये असंही सुनिता म्हणाली. सुनीता आहुजा आणि गोविंदाचं सातत्यानं चर्चेत आहे. दोघे डिवोर्स घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या सगळ्या चर्चांचं सुनितानं खंडन केलं.
advertisement
3/8
करवा चौथच्या दिवशी, सुनीता आहुजाने गोविंदाने तिला गिफ्ट केलेला नेकलेस दाखवला. ती कायम गोविंदाला सपोर्ट करते हे तिने अनेकदा सांगितलं आहे. नुकत्यात एका मुलाखतीत बोलताना सुनिता गोविंदाच्या अफेअरविषयी बोलली.
advertisement
4/8
सुनीता आहुजा यांनी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "गोविंदा आणि तिच्या एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअरच्या चर्चा सुरू होत्या त्यामुळे 2025 हे वर्ष माझ्यासाठी चांगलं नव्हतं. गोविंदाचे एका मुलीसोबत अफेअर आहे अशा अफवा मी ऐकल्या आहेत. पण मला माहित आहे की ती अभिनेत्री नाही कारण अभिनेत्री अशा चुकीच्या गोष्टी करत नाहीत."
advertisement
5/8
सुनीता आहुजा पुढे म्हणाली, "ती मुलगी गोविंदावर प्रेम करत नाही. तिला फक्त त्याच्या पैशात इंटेरेस्ट आहे. मला 2026 मध्ये माझे आयुष्य बदलायचं आहे. गोविंदानं हे सर्व वाद संपवावेत आणि 2026 मध्ये आमचं कुटुंब आनंदी राहावं अशी माझी इच्छा आहे."
advertisement
6/8
"मला आशा आहे की ते लवकरच घडेल. गोविंदाने हे समजून घ्यावे की त्याच्या आयुष्यातील तीन सर्वात महत्त्वाच्या महिला म्हणजे त्याची आई, त्याची पत्नी आणि त्याची मुलगी. कोणत्याही पुरूषाला त्याच्या आयुष्यात चौथी महिला असण्याचा अधिकार नाही. जरी तो गोविंदा असला तरी."
advertisement
7/8
सुनीता आहुजा पुढे म्हणाली, "मला वाटते की ची चीने तिच्या सर्व चापलूसी सोडून त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करावे कारण तेही फक्त पैशासाठी तिच्यासोबत आहेत."
advertisement
8/8
गोविंदा आणि सुनीता यांनी 1987 मध्ये लग्न केलं. 1989 मध्ये त्यांची मुलगी टीना जन्माला येईपर्यंत त्यांनी त्याचं लग्न सीक्रेट ठेवलं होतं. त्यानंतर दोघांना दोन मुलं झाली. त्यांचा 25 वर्षांचा सुखी संसार सुरू होता. पण अचानक त्याच्या नात्यात काही बिनसलं आणि गोविंदाचं अफेअर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ती फक्त पैशांसाठी चीचीसोबत...' मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, सुनिताचा शॉकिंग खुलासा