Hansika Motwani Love Story: बेस्ट फ्रेंडच्या पतीवर झालं प्रेम, घर तोडून थाटला संसार, आता अडीच वर्षांत घटस्फोटापर्यंत पोहोचलं नातं
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Hansika Motwani Love Story: 'शकालाका बूम बूम'मधून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी. आज तिचा 33 वा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने तिच्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/7

'शकालाका बूम बूम'मधून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी. आज तिचा 33 वा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने तिच्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
हंसिकाने टीव्ही, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही मोठे नाव कमावले. दोन वर्षांपूर्वी, 2022 मध्ये तिने उद्योगपती सोहेल कथुरियासोबत मोठ्या थाटामाटात लग्न केले, पण आता त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
3/7
हंसिका आणि सोहेलची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. हंसिका आणि सोहेल दोघेही बालपणापासूनचे मित्र आहेत. सोहेल हा केवळ हंसिकाचा मित्रच नाही, तर तिचा व्यावसायिक भागीदार देखील आहे.
advertisement
4/7
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सोहेल कथुरिया हा हंसिकाच्याच एका मैत्रिणीचा पहिला पती होता आणि हंसिका त्यांच्या लग्नालाही उपस्थित होती. त्यामुळे हंसिकाने तिच्या बेस्ट फ्रेंडच्याच पतीची लग्न केलं. ज्यामुळे तिला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
advertisement
5/7
जेव्हा हंसिका आणि सोहेलने त्यांच्या नात्याची घोषणा केली, तेव्हा अनेकांनी हंसिकाला 'घर तोडणारी' म्हणून ट्रोल केले. हंसिका आणि सोहेल यांच्या प्रेमाची सुरुवात 2021 मध्ये झाली. एकमेकांना एक वर्ष डेट केल्यानंतर, सोहेलने 2022 मध्ये पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर हंसिकाला फिल्मी स्टाईलमध्ये लग्नासाठी प्रपोज केले.
advertisement
6/7
त्यानंतर, 2022 मध्येच राजस्थानमधील जयपूर येथील ऐतिहासिक मुंडोटा फोर्ट अँड पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नात फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. हंसिकाने खास लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर सोहेलनेही पारंपरिक वेशभूषा केली होती. लग्नानंतर त्यांनी सोशल मीडियावर अनेक रोमँटिक फोटो शेअर केले, ज्यांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले.
advertisement
7/7
गेली दोन वर्षे हंसिका आणि सोहेलच्या वैवाहिक जीवनात सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं दिसत होतं. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत होते. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hansika Motwani Love Story: बेस्ट फ्रेंडच्या पतीवर झालं प्रेम, घर तोडून थाटला संसार, आता अडीच वर्षांत घटस्फोटापर्यंत पोहोचलं नातं