लग्नात वाढपी म्हणून करायची काम; प्लास्टिक सर्जरीनं बदललं आयुष्य; राखी सावंतचं खरं नाव माहितीये का?
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
‘ड्रामा क्वीन’ म्हटलं की एकच चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे राखी सावंत. राखीचा आज ४५ वा वाढदिवस आहे. मुंबईत साध्या कुटुंबात जन्मलेल्या राखीनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राखीनं आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. ड्रामा क्वीनचं खरं नाव राखी नसून वेगळंच आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त राखीविषयी काही रंजन गोष्टी जाणून घ्या.
advertisement
1/7

राखी सावंतचा जन्म 25 नोव्हेंबर 1978 रोजी मुंबईत झाला. आज राखीने आपली वेगळी ओळख निर्माण केली असली, तरी एक काळ असा होता जेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी तिने पडेल ते काम केलं. राखीनं आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. ड्रामा क्वीनचं खरं नाव राखी नसून वेगळंच आहे.
advertisement
2/7
राखी सावंतचं खरं नाव नीरु भेडा असं आहे. राखीच्या जन्माच्या वेळी तिची आई एका हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करत होती.
advertisement
3/7
राखी लहान असताना त्यांना धड दोन वेळेसचं जेवणही मिळत नसे. लोकांनी फेकून दिलेल्या अन्नावर मायलेकी जगत होत्या.
advertisement
4/7
दरम्यान, राखीच्या आईने दुसरं लग्न केलं. यानंतर राखीने दुसऱ्या वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे नीरु भेडाची राखी सावंत झाली. राखीला याच नावाने ओळख मिळाली.
advertisement
5/7
राखी सावंत हिने एक दिवसाचं जेवण मिळावं म्हणून चक्क अंबानींच्या घरातील एक लग्नात वाढपी म्हणून देखील काम केले होते. या कामासाठी राखीला एका दिवसाचे अवघे 50 रुपये मिळायचे.
advertisement
6/7
त्यानंतर राखीनं काही पैसे जमवून मनोरंजन विश्वात एंट्री घेतली. सुरुवातीला राखीला अनेक दुय्यम दर्जाच्या चित्रपटांमध्ये काम करावे लागले. या दरम्यान राखीला कास्टिंग काऊचचा सामनादेखील करावा लागला. काही काळाने तिने प्लास्टिक सर्जरी करून घेतली आणि स्वतःचा चेहरामोहराच बदलला.
advertisement
7/7
यानंतर तिने काही आयटम साँग्समध्ये काम केले, ज्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली. यानंतर राखी सलमान खानच्या बिग बॉसमध्ये एंट्री घेतली आणि तिचं आयुष्यच बदललं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नात वाढपी म्हणून करायची काम; प्लास्टिक सर्जरीनं बदललं आयुष्य; राखी सावंतचं खरं नाव माहितीये का?