डबल रोल करून हिरोईनच ठरली 'हिरो'! नॅशनल अवॉर्ड घेऊन गेली, खऱ्या हिरोचा हात रिकामीच
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bollywood Film : बॉलिवूडच्या एका फिल्मने बॉक्स ऑफिसची सगळी समीकरणं बदलून टाकली. दमदार अभिनय असूनही हिरोचं फक्त कौतुक झालं, नॅशनल पुरस्कार मिळवून हिरोईन पूर्ण क्रेडिट घेऊन गेली. हिरोइन जोरावरही ब्लॉकबस्टर देता येऊ शकतो हे या फिल्मने सिद्ध केलं.
advertisement
1/9

बॉलिवूडमध्ये आधी अनेकदा फिल्मचं संपूर्ण श्रेय हिरोला दिलं जातं. पण 2015 सालच्या एका फिल्मने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. एक अशी फिल्म जिने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या फिल्मची हिरो ठरली ती एक हिरोईन. जी नॅशनल अवॉर्ड घेऊन गेली आणि हिरोच्या हाती कौतुकाशिवाय दुसरं काहीच लागलं नाही.
advertisement
2/9
2011 मध्ये रिलीज झालेली ही फिल्म, 2015 साली त्याचा सीक्वेल आला. फिल्मचा दुसरा पार्ट आला तेव्हा तो इतका हिट होईल याची कल्पना कोणीही केली नव्हती.
advertisement
3/9
फिल्मने कमाईच्या बाबतीत नवीन रेकॉर्ड बनवला. त्यावेळी तब्बल 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारा हा भारतातील पहिला महिला प्रधान चित्रपट ठरला. जगभरात फिल्मने 250 कोटींची कमाई केली. चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत त्याचा नफा पाहून बॉलिवूडमधील मोठ्या सुपरस्टार्सनाही विचार करायला भाग पाडलं.
advertisement
4/9
फिल्ममध्ये एका अभिनेत्रीचा डबल रोल. तिच्या दुहेरी भूमिकेने इतकी चमक दाखवली की तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. फिल्मने अभिनेत्रीच्या कारकिर्दीला नव्या उंचीवर नेलं. तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
advertisement
5/9
जिच्यासमोर फिल्मचा हिरोही फिका ठरला फिल्मची हिरो ठरलेली हिरोईन ही दुसरी तिसरी कुणी नाही तर अभिनेत्री कंगना रणौत आहे. तिची डबल रोल असलेली फिल्म. ज्यात ती एका बाजूला ओल्ड, नखराळ तनु आणि दुसऱ्या बाजूला होती हरियाणवी ॲथलीट कुसुम संगवान, उर्फ दत्तो.
advertisement
6/9
कंगनाने दत्तोची भूमिका इतकी प्रभावीपणे साकारली की, तीच मुलगी तनुची भूमिका साकारत आहे हे लोक विसरून गेले. तिचा बोलण्याचा लहेजा, तिचे चेहऱ्यावरील हावभाव इतके अचूक होते की समीक्षकांपासून ते सामान्य प्रेक्षकांपर्यंत सर्वजण थक्क झाले.
advertisement
7/9
चित्रपटाचा हिरो आर. माधवन कंगनाच्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्याने आपल्या पत्नीसोबत शांत, गंभीर आणि त्रस्त असलेल्या पती मनूची भूमिका सहजतेने साकारली. त्याच्या अभिनयाची प्रशंसा खूप झाली पण पुरस्कारांच्या शर्यतीत तो कंगनाच्या दुहेरी भूमिकेपुढे थोडा मागे पडला.
advertisement
8/9
फिल्मने एकूण 12 पुरस्कार जिंकले. या फिल्ममधील डायलॉग आजही मीमच्या दुनियेत राज्य करतात. आयएमडीबीनुसार या फिल्मचं रेटिंग 7.6 आहे. ही फिल्म तुम्ही ओटीटीवरही पाहू शकता. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही फिल्म पाहता येईल.
advertisement
9/9
ही फिल्म आहे 'तनु वेड्स मनु' चा सीक्वेल 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' आनंद एल. राय दिग्दर्शित या फिल्मने बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नाही, तर कंगना रणौतला भारतीय सिनेमाची 'क्वीन' म्हणूनही प्रस्थापित केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
डबल रोल करून हिरोईनच ठरली 'हिरो'! नॅशनल अवॉर्ड घेऊन गेली, खऱ्या हिरोचा हात रिकामीच