TRENDING:

सचिन पिळगांवकरांनी सांगितली 9 व्या वर्षी केलेली कामगिरी, ऐकून भर मुलाखतीतच वडिलांवर हसू लागली श्रिया

Last Updated:
Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या गाडीचा एक अविश्वसनीय किस्सा सांगितला होता, जो ऐकून त्यांची मुलगी श्रिया पिळगांवकर हिला मात्र कॅमेऱ्यासमोर हसू आवरता आले नाही!
advertisement
1/9
सचिन पिळगांवकरांनी सांगितला किस्सा, ऐकून ऑन कॅमेराच वडिलांवर हसू लागली श्रिया
मुंबई: मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वाचे 'महागुरू' म्हणून लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांचे किस्से नेहमीच गाजतात.
advertisement
2/9
अगदी बालपणापासून सिनेसृष्टीत काम केलेल्या सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या गाडीचा एक अविश्वसनीय किस्सा सांगितला होता, जो ऐकून त्यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिला मात्र कॅमेऱ्यासमोर हसू आवरता आले नाही!
advertisement
3/9
सचिन पिळगांवकर यांनी त्यांची लेक श्रिया पिळगांवकरसोबत Mashable India ला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला होता.
advertisement
4/9
मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी थेट सांगितले की, "मी फक्त ९ वर्षांचा असताना माझ्या आयुष्यातली पहिली गाडी खरेदी केली!"
advertisement
5/9
त्यांनी सांगितले की, "ती गाडी मॉरिस माइनर होती, ज्याला लोक 'बेबी हिंदुस्थान' म्हणायचे. तिला बकेट सीट आणि फ्लोअर शिफ्ट गिअर होते. ती पेट्रोलवर धावणारी गाडी होती." त्यावेळी ते टायकलवाडी, शिवाजी पार्क इथे राहायचे.
advertisement
6/9
सचिन पिळगांवकर यांनी पहिली गाडी खरेदी केल्याचे ऐकून मुलाखतकाराला धक्का बसलाच, पण त्यानंतर त्यांनी जो किस्सा सांगितला, त्यावर श्रियाला अक्षरशः हसू फुटले.
advertisement
7/9
मुलाखतकाराने विचारले, "तुम्ही ती गाडी चालवायचे कसे?" त्यावर सचिन पिळगांवकर म्हणाले, "नाही, ड्रायव्हर होता. पण, मी ९ वर्षांचा असताना याच वरळी सीफेसवर त्या गाडीमधून गाडी चालवायला शिकलो!"
advertisement
8/9
वडिलांनी फक्त नऊ वर्षांचे असताना गाडी चालवायला शिकल्याचा किस्सा ऐकताच, श्रिया पिळगांवकरला मात्र मोठा धक्का बसला. ती वडिलांच्या बोलण्यावर ऑन कॅमेरा हसत सुटली. हा किस्सा तिला इतका गमतीशीर आणि अविश्वसनीय वाटला की ती आपले हसू आवरता आले नाही.
advertisement
9/9
अभिनेते, दिग्दर्शक, गायक अशा अनेक भूमिका साकारलेले सचिन पिळगांवकर हे 'नदिया के पार', 'बालिका वधू' अशा हिंदी चित्रपटांपासून ते 'अशीही बनवा बनवी', 'नवरा माझा नवसाचा' यांसारख्या लोकप्रिय मराठी चित्रपटांमुळे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सचिन पिळगांवकरांनी सांगितली 9 व्या वर्षी केलेली कामगिरी, ऐकून भर मुलाखतीतच वडिलांवर हसू लागली श्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल