Ishan Kishan ने अखेर समोर आणलंच, कोण आहे त्याची लेडी लक? Dhurandhar चा डायरेक्टरही करतो फॉलो
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ishan Kishan Girlfriend: ईशान किशनने बॅटिंगसोबतच फिल्डिंगमध्ये अशी काही कमाल करून दाखवली की भारतासाठी हा विजय मिळवणं सोपं झालं. पण ईशान किशनच्या खेळापेक्षाही सध्या एका चेहऱ्याची तुफान चर्चा रंगली आहे.
advertisement
1/9

काल रात्री ८ मार्च रोजी भारताने इतिहास रचला. अहमदाबाद स्टेडियममध्ये धमाकेदार कामगिरी करत भारताने टी२० वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. यानंतर संपूर्ण देशात जल्लोष साजरा करण्यात आला. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने न्यूझीलंडच्या संघाला चांगलीच धूळ चारली.
advertisement
2/9
भारतीय संघातील प्रत्येक स्पर्धकाने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली, मात्र ईशान किशनने बॅटिंगसोबतच फिल्डिंगमध्ये अशी काही कमाल करून दाखवली की भारतासाठी हा विजय मिळवणं सोपं झालं. पण ईशान किशनच्या खेळापेक्षाही सध्या एका चेहऱ्याची तुफान चर्चा रंगली आहे.
advertisement
3/9
हा चेहरा म्हणजे स्टेडियममध्ये बसून ईशानसाठी प्रार्थना करणारी त्याची लेडी लक आदिती हुंडिया. लाल रंगाचा टॉप घालून आदिती भारताच्या प्रत्येक विकेटवर आणि ईशानच्या प्रत्येक षटकारावर जल्लोष करत होती. तिच्यासोबत भारतीय ओपनर अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्माही होती.
advertisement
4/9
भारताने ट्रॉफी जिंकल्यानंतर आदिती मैदानात उतरून खेळाडूंच्या आनंदात सहभागी झाली. यावेळी ईशानने सर्व खेळाडूंना तिची ओळख करून दिली आणि सर्वांनी तिला 'भाभी जी' म्हणत ईशान आणि आदितीला चिडवू लागले. यावेळीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
advertisement
5/9
दरम्यान, ईशान किशनची ही लेडी लक कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आदिती ही केवळ ईशानची गर्लफ्रेंड नसून एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तिचा स्वतःचा फॅशन आणि मेकअप ब्रँड आहे.
advertisement
6/9
आदिती मूळची जयपूरची असून तिने जयपूरच्या सेंट जेव्हियर्स कॉलेजमधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. २०१७ मध्ये आदिती 'फेमिना मिस इंडिया'ची फायनलिस्ट होती.
advertisement
7/9
त्यानंतर २०१८ मध्ये तिने 'मिस दिवा सुपरनॅशनल'चा किताब पटकावून २०१९ मध्ये जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले.
advertisement
8/9
आदितीचे इंस्टाग्रामवर ३.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 'उरी' आणि आगामी 'धुरंधर' चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर देखील तिला फॉलो करतात.
advertisement
9/9
ईशान आणि आदिती गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. जरी या दोघांनीही कधी उघडपणे कबुली दिली नसली, तरी आयपीएल असो वा आताचा वर्ल्ड कप, आदिती नेहमीच ईशानला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजर असते. कालच्या फायनलमध्ये ईशानने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, तिला ईशान लेडी लक मानलं जातंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ishan Kishan ने अखेर समोर आणलंच, कोण आहे त्याची लेडी लक? Dhurandhar चा डायरेक्टरही करतो फॉलो