या सुंदरीनं दिसावं किती कमाल..! लाल साडीत जान्हवीच्या बोल्ड अदा, चाहते फिदा, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Jahnavi Killeka : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरनं व्हॅलेंटाईनच्या निमित्तानं रेड साडीत बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
advertisement
1/9

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं सर्वत्र प्रेमाचे रंग पाहायला मिळत आहेत. मनोरंजनविश्वातील कलाकारही खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.
advertisement
2/9
अभिनेत्री जाह्नवी किल्लेकरनं खास फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. तिच्या फोटोशूटने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं. तिच्या स्टाइल आणि सौंदर्याची पुन्हा चर्चा रंगली आहे.
advertisement
3/9
जाह्नवीने या फोटोशूटसाठी लाल रंगाची साडी नेसली आहे. या साडीवर व्हाइट कलरचे हार्ट डिझाईन आहेत. हातात लाल गुलाब घेत तिनं वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
advertisement
4/9
जान्हवीचा आत्मविश्वास आणि ग्लॅमर पाहून चाहते तिच्या प्रेमात पडलेत. साडीमध्येही मॉडर्न आणि बोल्ड अंदाजाने जान्हवीनं सगळ्यांची मनं जिंकलीत.
advertisement
5/9
जान्हवीचे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "या सुंदरीनं दिसावं किती कमाल..!" असं म्हणत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी 'क्लासी', 'स्टनिंग' म्हणत कमेंट्स केल्यात.
advertisement
6/9
जाह्नवीने हे फोटो शेअर करत एक खास कॅप्शनही दिलं. "माझे चाहते = माझी ताकद = माझे व्हॅलेंटाइन" असं म्हणत तिनं आपल्या चाहत्यांप्रती प्रेम व्यक्त केलं आहे.
advertisement
7/9
बिग बॉस मराठी 5 मुळे जान्हवीला खरी लोकप्रियता मिळाली. तिचा स्पष्टवक्तेपणा आणि तिचा ड्रामा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शो संपल्यानंतरही तिची चर्चा कायम राहिली.
advertisement
8/9
बिग बॉसनंतर जान्हवी किल्लेकर The 50 या कार्यक्रमातही सगभागी झाली होती. पण या शोमध्ये तिचा प्रवास फक्त 10 दिवसच टिकला.
advertisement
9/9
जान्हवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं शेअर केलेल्या या लाल साडीतील फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
या सुंदरीनं दिसावं किती कमाल..! लाल साडीत जान्हवीच्या बोल्ड अदा, चाहते फिदा, PHOTO