आधी यशस्वी अभिनेत्री, आता खासदारही झाली; पण कधी लग्न करतेय कंगना? अभिनेत्रीनं दिलं उत्तर
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
कंगना रणौत आता फक्त बॉलिवूड अभिनेत्रीच नाही तर मंडीची खासदार देखील आहे. कंगना रणौतच्या खाजगी जीवनाविषयी जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता नुकतंच कंगनाने लग्न आणि लाइफ पार्टनरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
advertisement
1/9

कंगना रणौत आता फक्त बॉलिवूड अभिनेत्रीच नाही तर मंडीची खासदार देखील आहे. कंगना रणौतच्या खाजगी जीवनाविषयी जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात.
advertisement
2/9
कंगना रणौत आता 39 वर्षांची आहे. त्यामुळेच कंगना लग्न कधी करतेय याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. आता तिने नुकतंच लग्नाच्या योजनांबद्दल प्रतिक्रिया दिली.
advertisement
3/9
कंगना रणौत नुकतीच राज शामानीच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने चित्रपट, बॉलिवूड पार्ट्या, सेलिब्रिटी आणि तिचं बालपण यासह अनेक गोष्टींवर प्रतिक्रिया दिल्या.
advertisement
4/9
कंगना रणौतला यावेळी 'लग्न करणं आवश्यक आहे का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, 'मला वाटतं एक जोडीदार असावा. सोबतीशिवाय जगणं कठीण होऊन बसतं.'
advertisement
5/9
ती पुढे म्हणाली, 'जीवनसाथीशिवाय आयुष्य अवघड होऊन बसतं. त्यामुळे लग्न करणं अनिवार्य आहे.'
advertisement
6/9
पण कंगना याविषयीच पुढे म्हणाली, 'दुसरी गोष्ट अशी आहे की जोडीदार असणं देखील कठीण आहे. योग्य जोडीदार शोधणं हे एक आव्हान आहे. योग्य वेळी योग्य जोडीदार मिळतो. यासाठी वयाची मर्यादा नाही.'
advertisement
7/9
कंगना रणौत पुढे म्हणाली, 'तुमचं वय जसजसं वाढत जातं तसतसं गोष्टी जुळवून घेणं कठीण होतं. लहान वयात लग्न झालं तर जुळवून घेणं सोपं जाऊ शकतं. त्यामुळेच आजही खेड्यापाड्यात लहान वयातच लग्न लावलं जातात.' असं मत कंगनाने व्यक्त केलं आहे.
advertisement
8/9
कंगना रणौतच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘इमर्जन्सी’ या पीरियड ड्रामामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अभिनेत्रीशिवाय अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि महिमा चौधरीसारखे स्टार्स आहेत.
advertisement
9/9
कंगना रणौत ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट येत्या 6 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी यशस्वी अभिनेत्री, आता खासदारही झाली; पण कधी लग्न करतेय कंगना? अभिनेत्रीनं दिलं उत्तर