TRENDING:

'मी एका शूर मुलाला जन्म दिला...' सैफ-करिनाने मुलाचं नाव ‘तैमूर’ का ठेवलं? अखेर बेबोने खरं कारण सांगितलंच, म्हणाली...

Last Updated:
Bollywood controversy : १६ ऑक्टोबर २०१२ रोजी करीना आणि सैफचं लग्न झालं होतं आणि २०१६ मध्ये त्यांना तैमूर झाला. त्याच्या नावामुळे दोन्ही कुटुंबियांची बरीच ट्रोलिंग झाली होती.
advertisement
1/7
सैफ-करिनाने मुलाचं नाव ‘तैमूर’ का ठेवलं? अखेर बेबोने खरं कारण सांगितलंच
मुंबई: बॉलिवूडची 'बेगम' करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विवेक अग्निहोत्रीच्या आगामी 'बंगाली फाइल्स'च्या ट्रेलरमध्ये एका मुलाचं नाव तैमूर असल्यामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.
advertisement
2/7
१६ ऑक्टोबर २०१२ रोजी करीना आणि सैफचं लग्न झालं होतं आणि २०१६ मध्ये त्यांना तैमूर झाला. त्याच्या नावामुळे दोन्ही कुटुंबियांची बरीच ट्रोलिंग झाली होती. तेव्हा, तैमूरच्या नावावरून ट्रोलिंग झाल्यानंतर करीनाने एका मुलाखतीत नेमकं काय सांगितलं होतं, हे आपण पाहू.
advertisement
3/7
करीनाने एका मुलाखतीत तैमूरचं नाव ठेवण्यामागचं खरं कारण सांगितलं होतं. ती म्हणाली होती, “हे नाव माझ्या पतीने निवडलं होतं. सैफला इतिहासाची खूप आवड आहे. त्याला महान योद्ध्यांच्या गोष्टी वाचायला आवडतात. मला वाटतं, तो मंगोल शासक तैमूरचा खूप मोठा चाहता आहे.”
advertisement
4/7
करीनाने पुढे सांगितलं होतं की, सैफने लहानपणी तैमूरबद्दल खूप काही वाचलं होतं. पण याशिवाय दुसरंही एक कारण होतं. “त्यांच्या शेजाऱ्याचं नावही तैमूर होतं आणि ते नाव सैफला खूप आवडलं होतं. तैमूर नावाचा अर्थ ‘आयर्न मॅन’ म्हणजेच ‘मजबूत माणूस’ असा होतो. सैफने मला हे सांगितलं, तेव्हा मलाही हे नाव खूप आवडलं.”
advertisement
5/7
करीनाने 'इंडिया टुडे'सोबत बोलताना एक मोठा खुलासा केला होता. ती म्हणाली, “जेव्हा तैमूरचं नाव ठरवलं, तेव्हा खूप ट्रोलिंग झाली, पण अनेक लोकांनी आम्हाला पाठिंबाही दिला. ज्या दिवशी मी डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जात होते, तेव्हा सैफने मला विचारलं होतं की, मुलाचं नाव ‘फैज’ ठेवूया का? तो म्हणाला, बेबो! हे नाव एका शायरचं आहे. पण मला ते नाव आवडलं नाही.”
advertisement
6/7
करीना म्हणाली, “मग त्याने ‘तैमूर’ हे नाव सुचवलं. मी एका शूर मुलाला जन्म दिला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.”
advertisement
7/7
सैफनेही एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘तैमूर’ या नावाचा अर्थ ‘आयर्न मॅन’ असा होतो आणि त्याला हे नाव खूप आवडलं होतं. त्याने इतिहासकार तैमूरच्या नावावर मुलाचं नाव ठेवलं नाही, असंही स्पष्ट केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी एका शूर मुलाला जन्म दिला...' सैफ-करिनाने मुलाचं नाव ‘तैमूर’ का ठेवलं? अखेर बेबोने खरं कारण सांगितलंच, म्हणाली...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल