मलायका-अरबाजच्या संसारात अर्जुन कपूरने पाडली फूट? घटस्फोटाच्या 7 वर्षांनी अभिनेत्रीने अखेर खरं काय ते सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Malaika Arora And Arbaaz Khan Divorce reason : वयाच्या पन्नाशीतही वीशीची दिसणारी बॉलिवूडची फिट अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. मलायकाने सलमान खानचा भाऊ अरबाज बरोबर लग्न केलं होतं. मलायकाने स्वतः अरबाजला लग्नाची मागणी घातली होती. पण 19 वर्षांनी तिने अरबाजला घटस्फोट दिला. दोघांचा घटस्फोट का झाला असा प्रश्न अनेकांना पडला होता.
advertisement
1/8

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी त्यांचा 19 वर्षांचा संसार मोडून 2017 साली वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2/8
मीडिया रिपोर्टनुसार, अरबाज खान आणि मलायका अरोराच्या घटस्फोटाचे कारण अभिनेता अर्जुन कपूर होता. याच काळात अरबाज खान मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनमध्ये होता असेही म्हटले जातं.
advertisement
3/8
मलायकाने तिच्या चॅट शोमध्ये म्हटले होते की, "माझे वैवाहिक आयुष्य खराब होत चालले होते. माझ्या आणि अरबाजच्या नात्यात सगळं काही ठीक नव्हते."
advertisement
4/8
"मला माझ्या घरातून बाहेर पडायचे होते म्हणून मी अरबाजबरोबर लग्न केले होते. माझे घर खूप कंजेस्टिव्ह होते आणि मला या ग्लॅमर जगात राज्य करायचे होते."
advertisement
5/8
मलायका पुढे म्हणाली होती, "अरबाजबरोबर लग्न करून मी खूप आनंदी होते कारण इंडस्ट्रीतील इतक्या मोठ्या कुटुंबाची मी सून झाले होते. लग्न झाले तेव्हा माझे वय खूप लहान होते."
advertisement
6/8
"मी स्वतः अरबाजला लग्नाची मागणी घातली होती आणि तो लग्नासाठी तयार झाला होता. पण हे माहित नव्हते की लग्नानंतर आयुष्य बदलून जाईल. मला आयुष्यात काहीतरी वेगळे हवे होते आणि आयुष्य मला वेगळ्याच दिशेने घेऊन जात होते."
advertisement
7/8
मलायका म्हणाली, "1998 साली आम्ही लग्न केले. 'दबंग' सिनेमा रिलीज झाला तोपर्यंत आमच्यात सगळं काही ठीक होते. पण त्यानंतर अरबाज खूप चिडचिड झाला."
advertisement
8/8
"आम्ही एकमेकांपासून दूर जाऊ लागलो होतो. आमचे विचार बदलू लागले होते. आम्ही प्रत्येक गोष्टीवर भांडायला लागलो आणि हळू हळू आमच्यातले हे अंतर वाढू लागले."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मलायका-अरबाजच्या संसारात अर्जुन कपूरने पाडली फूट? घटस्फोटाच्या 7 वर्षांनी अभिनेत्रीने अखेर खरं काय ते सांगितलं