Shivani Surve: हातात बंदूक, गळ्यात लाल ओढणी; मराठमोळ्या शिवानी सुर्वेचा कधीही न पाहिलेला लूक
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
after operation London Cafe movie: मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वेनं आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. अशातच अभिनेत्री तिच्या नव्या सिनेमाच्या हटके लूकमुळे चर्चेत आली आहे.
advertisement
1/7

मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वेनं आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. अशातच अभिनेत्री तिच्या नव्या सिनेमाच्या हटके लूकमुळे चर्चेत आली आहे.
advertisement
2/7
'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या मराठी सिनेमाच्या पोस्टरने आणि टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढवली आहे. यामध्ये शिवानी सुर्वेच्या हटके लूक पहायला मिळतोय. तिचा हा हटके लूक सध्या चर्चेचा विषय ठरत असून तिचा हा लूक चांगलाच व्हायरल होतोय.
advertisement
3/7
'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' चित्रपटात शिवानी सुर्वेचा लूक खूप वेगळा आहे. आत्तापर्यंत तिचा असा लूक पहायला मिळाला नाही. हातात बंदूक, धारदार नजर असा शिवानीचा अंदाज पाहून चाहते थक्क झाले.
advertisement
4/7
शिवानी सुर्वे 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' चित्रपटात धडाकेबाज एक्शन करताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक तिचा नवा अंदाज पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
advertisement
5/7
दिपक पांडुरंग राणे यांनी 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वेशिवाय विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चावरे, शलाका पवार या मराठी कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार कवीश शेट्टी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
advertisement
6/7
मराठी आणि साऊथ कलाकारांच्या अभिनयाने 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' चित्रपट बनला आहे. आता या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे.
advertisement
7/7
'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' हा चित्रपट मराठी आणि कन्नड सिनेमाचं कोलॅबोरेशन आहे. हा सिनेमा कन्नडा, मराठी, हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम या 6 भाषांमध्ये पॅन इंडिया रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shivani Surve: हातात बंदूक, गळ्यात लाल ओढणी; मराठमोळ्या शिवानी सुर्वेचा कधीही न पाहिलेला लूक