TRENDING:

मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न, एक महिन्यापूर्वी दिली Good News, धर्माच्या पलीकडे जाऊन देवोलिनाने मुलाला दिलं खास नाव

Last Updated:
गेल्याच महिन्यात देवोलिना आणि शहनवाजच्या घरी लहानग्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. यानंतर त्यांच्या आयुष्यात आनंदाची लाट आली आहे.
advertisement
1/7
धर्माच्या पलीकडे जाऊन देवोलिना भट्टाचार्जीने मुलाला दिलं खास नाव
हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने २०२२ साली तिचा जिम ट्रेनर शहनवाज शेखशी गुपचूप लग्न केले होते. तिच्या लग्नानंतर अनेकांना धक्का बसला होता.
advertisement
2/7
मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे देवोलिनाना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. मात्र आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवोलिनाने सगळ्यांचीच बोलती बंद केली होती.
advertisement
3/7
दरम्यान, गेल्याच महिन्यात देवोलिना आणि शहनवाजच्या घरी लहानग्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. यानंतर त्यांच्या आयुष्यात आनंदाची लाट आली आहे.
advertisement
4/7
मुलाच्या जन्मानंतर देवोलिना आणि शहनवाज खूपच खूश आहेत. ते अनेकदा त्यांच्या मुलासोबतचे फोटो शेअर करत असतात. मात्र अद्याप त्यांनी त्यांच्या गोंडस बाळाचा चेहरा दाखवला नाही आहे.
advertisement
5/7
देवोलिना भट्टाचार्जीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या मुलासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिचा पती शाहनवाज शेखही तिच्यासोबत दिसत आहे.
advertisement
6/7
दरम्यान, देवोलिनाने तिच्या मुलाचं नाव चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे. या हिंदू-मुस्लिम जोडप्याने कोणत्याही धर्माच्या पलिकडे जाऊन आपल्या मुलाचं नाव ठेवलं आहे.
advertisement
7/7
देवोलिनाने आपल्या मुलाचं नाव जॉय असं ठेवलं आहे. जॉयचा अर्थ आनंद असा होतो. या बातमीनंतर नेटकऱ्यांनी देवोलिना आणि शहनवाजवर शुभेच्छांचा वर्षाव केला असून बाळाला प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न, एक महिन्यापूर्वी दिली Good News, धर्माच्या पलीकडे जाऊन देवोलिनाने मुलाला दिलं खास नाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल