'माझी मातृभाषा मराठी, स्वप्नही मराठीतच पडतात...' नानांचा सचिन पिळगांवकरांना जोरदार टोला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Nana Patekar - Sachin Pilgaonkar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उर्दूवर निस्सीम प्रेम असणाऱ्या अभिनेते सचिन पिळगांवकरांना यांना टोला लगावला आहे. नाना नेमकं काय म्हणाले पाहूयात.
advertisement
1/7

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या अनेक मुलाखती सध्या व्हायरल होत असतात. त्यामुळे ते कायमच चर्चेत आले आहेत. दरम्यान काही दिवसांआधी एका कार्यक्रमात बोलताना सचिन पिळगांवकर यांनी त्यांचं उर्दूवरील प्रेम व्यक्त केलं होतं. त्यानंतर ते सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले.
advertisement
2/7
'बहार-ए-उर्दू' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपलं उर्दूवरचं प्रेम जगाला दाखवून दिलं होते. ते म्हणाले होते "माझी मातृभाषा ही मराठी आहे पण मी विचार उर्दूमध्ये करतो. रात्री 3 वाजता कोणी उठवतं तरी मी उर्दू बोलत उठतो."
advertisement
3/7
सचिन पिळगांवकर यांनी दाखवलेल्या त्यांच्या उर्दूवरील प्रेमानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. अनेक कलाकारांनाही त्यांना नकळत टोले लगावले होते. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सचिन पिळगांवकर यांना मराठी भाषेवरून टोला लगावला आहे.
advertisement
4/7
नाना पाटेकर नुकेतच छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे त्यांनी हिंदी भाषेत भाषण केलं. भाषणाच्या शेवटी त्यांनी त्यांचं मराठीवरील प्रेम दाखवून दिलं. बोलताना त्यांनी सचिन पिळगांवकर यांना टोलाही लगावला.
advertisement
5/7
नाना पाटेकर म्हणाले, "मराठी बोलताना कसं असतं की शब्द तुम्हाला शोधावे लागत नाहीत, ते सहज येतात, पटकन येतात. पण मला स्वप्नच मराठीमध्ये पडतात त्यामुळे ती माझी मातृभाषा आहे. पण तरीही सगळ्यांना कळावं म्हणून मी हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होतो."
advertisement
6/7
नाना पाटेकर आणि सचिन पिळगांवकर मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकारांपैकी एक आहेत. दोघे एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत.
advertisement
7/7
नाना पाटेकर यांनी एक वर्षांआधी त्यांचा नाना छंद हा गाण्यांचा अल्बम लाँच केला. ज्यात नानांनी लिहिलेली गीतं होतं. या अल्बमच्या लाँचला त्यांनी सचिन पिळगांवकर यांना आमंत्रित केलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझी मातृभाषा मराठी, स्वप्नही मराठीतच पडतात...' नानांचा सचिन पिळगांवकरांना जोरदार टोला