TRENDING:

'अर्धा तास उशीर झाला असता तर…', नंदेश उमप यांना एकाचवेळी 3 हार्ट अटॅक, सांगितलं नेमकं काय घडलं होतं!

Last Updated:
Nandesh Umap Heart Attack : गायक आणि अभिनेते नंदेश उमप यांना तीन हार्ट अटॅक आले. कार्यक्रमा दरम्यान काय घडलं याचा धक्कादायक अनुभव त्यांनी सांगितला.
advertisement
1/8
'अर्धा तास उशीर झाला असता तर…', नंदेश उमप यांना एकाचवेळी आलेले 3 हार्ट अटॅक
हार्ट अटॅक</a> आला. अमोल बावडेकर आता बरे झाले असून त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे." width="1200" height="900" /> काही महिन्यांपूर्वी अभिनेते अमोल बावडेकर यांना नाटकाच्या प्रयोगाआधी हार्ट अटॅक आला. अमोल बावडेकर आता बरे झाले असून त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.
advertisement
2/8
अशातच प्रसिद्ध अभिनेते आणि गायक नंदेश उमप यांनी एक धक्कादायक माहिती सांगितली. काही महिन्यांपूर्वी त्यांना तीन हार्ट अटॅक आल्याचं त्यांनी सांगितलं. चालू कार्यक्रमादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
advertisement
3/8
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत नंदेश उमप यांनी सांगितलं, "माझ्यासोबत खूप मोठा आघात झाला. मला कळत नव्हतं की काय होत आहे. दोन दिवस आधी 6 तारखेला माझ्या पाठीत खूप दुखत होतं. त्यानंतर 9 तारखेला खूपच दुखायला लागलं."
advertisement
4/8
"मी एका कार्यक्रमाला जात होतो तिथे मला खूप त्रास झाला. तो त्रास झाल्यावर माझा श्वास जड होत होता. मला तिथून थेट ज्युपिटर हॉस्पिटलला नेण्यात आलं. मी मूठ आवळून घेतली होती."
advertisement
5/8
नंदेश उमप यांनी पुढे सांगितलं, "मला आणि माझ्या घरच्यांना कळलं होतं की काहीतरी गडबड आहे. त्या दिवशी रविवार होता त्यामुळे खूप गर्दी. बायकोने सांगायच्या आधी मी चालत गेलो. मला व्हिलचेअर देण्यात आली. तिथल्या डॉक्टर आणि नर्सने मला तपासलं, माझा ECG काढला त्यात गडबड होती. त्यानंतर डॉक्टरांनी मला एक इंजेक्शन दिलं आणि तेव्हा कुठे मी स्टेबल झालो."
advertisement
6/8
नंदेश उमप यांना त्यांच्या बायकोने सांगितलं की, "तुला आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि इतका पाऊस सुरू झाला होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. आम्ही आणखी अर्धा तास उशीर केला असता तर... पण मला नव्हतं जायचं."
advertisement
7/8
"हे सगळं होण्याआधी माझी आई गेली. याआधीही तिने दोन वेळा तिने मला वाचवलं होतं. यावेळीही मला वाटतं आई म्हणाली असेल तू थांब मी जाते", असं नंदेश उमप यांनी भावुक होत सांगितलं.
advertisement
8/8
सगळ्यांनी नियमित आपलं बॉडी चेकअप करून घ्या असं आवाहनही नंदेश उमप यांनी चाहत्यांना केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'अर्धा तास उशीर झाला असता तर…', नंदेश उमप यांना एकाचवेळी 3 हार्ट अटॅक, सांगितलं नेमकं काय घडलं होतं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल