लाल साडी, पांढरं शर्ट, निक्की आणि अरबाजचा रोमँटिक अंदाज कॅमेऱ्यात कैद! फोटोंनी इंटरनेटवर लावली आग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Nikki Tamboli and Arbaaz Patel : निक्की आणि अरबाजच्या फोटोंनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमधून त्यांच्यातील केमिस्ट्रीची झलक स्पष्टपणे दिसली.
advertisement
1/8

मुंबई: 'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर चर्चेत आलेली जोडी म्हणजेच अभिनेत्री निक्की तांबोळी आणि मॉडेल अरबाज पटेल. शो संपल्यानंतरही अरबाज आणि निक्की वेगवेगळ्या कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावतात. इतकंच नाही, तर ते अनेकदा डेटवर जातानाही दिसतात. सोशल मीडियावरही ते त्यांच्या फोटोशूटमधील फोटो बऱ्याचदा शेअर करत असतात.
advertisement
2/8
दरम्यान, निक्की आणि अरबाजच्या फोटोंनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमधून त्यांच्यातील प्रेमळ नात्याची आणि केमिस्ट्रीची झलक स्पष्टपणे दिसली.
advertisement
3/8
चाहते त्यांच्यावर फिदा झाले आहेत. निक्कीने या फोटोंना “Mausam Mastana” (मौसम मस्ताना) असं कॅप्शन दिलं आहे, जे त्यांच्या रोमँटिक अंदाजाला अधिकच बळ देत आहे.
advertisement
4/8
निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांनी नुकतंच एकत्र फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील प्रत्येक फ्रेममध्ये निक्की आणि अरबाज यांच्यातील जवळीक आणि प्रेमळ बंध स्पष्टपणे दिसून येत आहेत.
advertisement
5/8
कधी ते दोघे एकमेकांच्या डोळ्यांत हरवलेले दिसतात, तर कधी एकमेकांच्या कुशीत विसावलेले. या फोटोंमधून त्यांची केमिस्ट्री आणि एकमेकांबद्दलचं प्रेम सहज जाणवतं.
advertisement
6/8
निक्कीने या फोटोशूटसाठी लाल रंगाची साडी परिधान केली आहे, तर अरबाज पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे. या वेशभूषेने त्यांच्यातील रोमँटिक वातावरण आणखीनच वाढवलं आहे. अरबाजसोबत तिची जोडी खूपच सुंदर दिसते, तर त्यांच्यातील जवळीक फोटोंमधून स्पष्टपणे समोर येते.
advertisement
7/8
'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर आल्यानंतर निक्की तांबोळीने तिच्या निर्भीड आणि बेधडक स्वभावाने करोडो मने जिंकली होती. तिची स्पष्टवक्तेपणा आणि तिचा बिंधास्त अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला होता. दुसरीकडे, अरबाज पटेल स्वतः एक प्रसिद्ध मॉडेल आहे. अरबाजसोबत निक्कीची जोडी नेहमीच मनमोहक आणि चित्तवेधक ठरली आहे.
advertisement
8/8
या दोघांच्या नात्याबद्दल चाहते नेहमीच उत्सुक असतात आणि त्यांच्या प्रत्येक अपडेटवर बारीक लक्ष ठेवतात. सोशल मीडियावर शेअर केलेले हे नवीन फोटो त्यांच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का आहेत. हे फोटो प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी त्यांच्या केमिस्ट्रीचं कौतुक करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लाल साडी, पांढरं शर्ट, निक्की आणि अरबाजचा रोमँटिक अंदाज कॅमेऱ्यात कैद! फोटोंनी इंटरनेटवर लावली आग