TRENDING:

OTT Release This Week : धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा OTT वर! फेब्रुवारीचा लास्ट वीक क्राइम-थ्रिलरने गाजणार, काय पाहाल?

Last Updated:
OTT Release This Week : फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा OTT प्रेक्षकांसाठी जबरदस्त ठरणार आहे. विविध जॉनरमधील मोठी नावं आणि दमदार कथा असलेल्या वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत.
advertisement
1/7
धर्मेंद्रंचा शेवटचा सिनेमा OTT वर! फेब्रुवारीचा लास्ट वीक क्राइम-थ्रिलरने गाजणार
इक्किस (26 फेब्रुवारी - Prime Video) दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा हा युद्धपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1971 च्या बसंतरच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर कथा उलगडते. चित्रपटात युद्धदृश्यांबरोबरच वडील ब्रिगेडियर मदन लाल खेतरपाल आणि पाकिस्तानातील ब्रिगेडियर जान मोहम्मद निसार यांच्यातील भावनिक भेटही दाखवली आहे. सीमा ओलांडणाऱ्या वेदना आणि सैनिकांचा सन्मान यांचा वेध हा चित्रपट घेतो.
advertisement
2/7
द ब्लफ (25 फेब्रुवारी - Prime Video) 19 व्या शतकातील कॅरिबियनमध्ये घडणाऱ्या या कथेत प्रियंका चोप्रा जोनास ‘ब्लडी मेरी’ नावाच्या माजी समुद्री डाकूची भूमिका साकारली आहे.. शांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या नायिकेचा भूतकाळ पुन्हा समोर येतो आणि तिला कुटुंब वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हा चित्रपट मातृत्व आणि जगण्याच्या लढाईवर आधारित आहे.
advertisement
3/7
One Battle After Another  (26 फेब्रुवारी - JioHotstar) राजकीय कट्टरतावाद, पाळत ठेवणे आणि भूतकाळातील शत्रुत्व या पार्श्वभूमीवर आधारित अॅक्शन ड्रामा. लिओनार्डो डिकॅप्रियो माजी क्रांतिकारकाच्या भूमिकेत दिसतो, ज्याला आपल्या मुलीचे रक्षण करताना जुने संघर्ष पुन्हा सामोरे जावे लागतात.
advertisement
4/7
Accused (27 फेब्रुवारी -Netflix) अनुभूती कश्यप दिग्दर्शित या मानसशास्त्रीय नाटकात कोंकणा सेन शर्मा डॉक्टरच्या भूमिकेत आहे. गैरवर्तनाच्या आरोपानंतर तिचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य कसं ढवळून निघतं, याची थरारक मांडणी यात आहे.
advertisement
5/7
ब्लॅक फोन 2 (28 फेब्रुवारी - JioHotstar) पहिल्या भागानंतर चार वर्षांनी घडणारी ही कथा अलौकिक शक्तींशी पुन्हा एकदा सामना घडवते. भीती आणि मानसिक आघात यांचा मिलाफ यात पाहायला मिळतो.
advertisement
6/7
याशिवाय सायको सैयान (Amazon MX Player), संगमरमर (JioHotstar), द ग्रे हाऊस (Prime Video), Monarch: Legacy of Monsters (Apple TV+) आणि अंधा प्यार 2.0 (ZEE5) देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
advertisement
7/7
फेब्रुवारीचा शेवट OTT वर अॅक्शन, इतिहास, थरारक सिनेमांचं पॅकेज मिळणार आहे. त्यामुळे या विकेंडला यातील एक वेब सीरिज किंवा सिनेमा पाहून टाका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Release This Week : धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा OTT वर! फेब्रुवारीचा लास्ट वीक क्राइम-थ्रिलरने गाजणार, काय पाहाल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल