TRENDING:

T20 World Cup : सूर्याच्या हातात नाही सेमी फायनलचं इक्वेशन, आता एकच संघ टीम इंडियाला वाचवणार!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा पराभव झाल्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा प्रवास खडतर झाला आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला आता दुसऱ्या टीमवर अवलंबून राहावं लागणार आहे.
advertisement
1/6
सूर्याच्या हातात नाही सेमी फायनलचं इक्वेशन, आता एकच संघ टीम इंडियाला वाचवणार!
सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 76 रननी धूळ चारली. या पराभवानंतर टीम इंडियाच्या नेट रनरेटलाही मोठा धक्का बसला आहे. भारताचा नेट रनरेट आता मायनस 3.800 एवढा झाला आहे.
advertisement
2/6
सुपर-8 मध्ये 8 टीमना चार-चारच्या ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे, त्यामुळे दोन्ही ग्रुपमधल्या टॉपच्या 2-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. ग्रुपमधल्या 3 पैकी 3 मॅच जिंकणारी टीम थेट सेमी फायनलमध्ये पोहोचेल, तर 3 पैकी 2 मॅच जिंकणाऱ्या टीमला दुसऱ्या टीमवर आणि नेट रनरेटवर अवलंबून राहावं लागेल.
advertisement
3/6
3 मॅचपैकी 1 मॅच जिंकणारी तसंच तिन्ही मॅच गमावणारी टीम सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर होईल. सेमी फायनलच्या या समीकरणांमुळे टीम इंडियासाठी आता ग्रुपमधल्या दुसऱ्या मॅच महत्त्वाच्या ठरणार आहेत.
advertisement
4/6
वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात सोमवारी वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे त्यांच्या ग्रुप स्टेजमधल्या सर्व मॅच जिंकून सुपर-8 मध्ये आल्या आहेत.
advertisement
5/6
टीम इंडियाला आता सेमी फायनलला पोहोचायचं असेल तर त्यांना झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध जिंकावच लागणार आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका त्यांच्या उरलेल्या दोन्ही मॅच जिंकावी, यासाठी प्रार्थना करावी लागेल.
advertisement
6/6
दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला तर 6 पॉईंट्ससह ते सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. भारतानेही झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला धूळ चारली तर टीम इंडियाचे 4 पॉईंट्स होतील. या परिस्थितीमध्ये वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे फक्त 2 पॉईंट्सवर राहतील, त्यामुळे टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सूर्याच्या हातात नाही सेमी फायनलचं इक्वेशन, आता एकच संघ टीम इंडियाला वाचवणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल