TRENDING:

Tejashri Pradhan : बाहेरून #HappyLife, आतून संघर्ष! अनेक रात्री रडत झोपली, पहिल्यांदाच व्यक्त झाली तेजश्री प्रधान

Last Updated:
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान चाहत्यांसमोर नेहमीच आनंदी आणि पॉझिटिव्ह दिसते. पण हे सगळं मिळवण्यासाठी तिनं आयुष्यात खूप संघर्ष केला. आयुष्याची इमोशनल बाजू सांगत तेजश्री प्रधान पहिल्यांदाच व्यक्त झाली.
advertisement
1/7
आनंदी आयुष्यासाठी अनेक रात्री रडत झोपली, पहिल्यांदाच व्यक्त झाली तेजश्री प्रधान
मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या करिअरच्या उत्तम टप्प्यावर आहे. तिची 'वीण दोघांतली' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून मालिकेला चांगला टीआरपी मिळत आहे.
advertisement
2/7
तेजश्री सोशल मीडियावरही सक्रिय असून अनेकदा #HappyLife हा हॅशटॅग वापरत असते. ती आनंदी आयुष्य जगतेय असं ती नेहमीच सांगत असते.  मात्र अलीकडेच तिने शेअर केलेली एक इमोशनल पोस्ट चर्चेत आली आहे.
advertisement
3/7
तेजश्रीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "ती किती नशीबवान आहे… नाही, ती फक्त नशीबवान नाही. तिने खूप मेहनत घेतली. तिने आपल्या माणसांना गमावलं. ती अनेक रात्री रडत झोपली. तिने टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं."
advertisement
4/7
"तिला अनेक वेळा हार मानावीशी वाटली, पण तिने तसं केलं नाही. कारण हार मानणं हा पर्यायच नाही." #HappyLife हा हॅशटॅग देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
5/7
तेजश्रीच्या आयुष्यातील चढ-उतार आले. 'होणार सून मी या घरची' या मालिकेदरम्यान तिची आणि शशांक केतकर यांची ओळख झाली. मालिकेतील ऑनस्क्रीन जोडी नंतर रिअल लाइफमध्येही एकत्र आली आणि दोघांनी लग्न केलं. मात्र काही वर्षांतच दोघांचा घटस्फोट झाला. त्या काळात तेजश्रीला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
advertisement
6/7
घटस्फोटानंतरही तिच्या आयुष्यातील आव्हाने थांबली नाहीत. मध्यंतरी तिच्या आईचं निधन झालं ज्याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला. तसेच 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका तिने अर्धवट सोडल्यामुळेही सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं होतं.
advertisement
7/7
आज वयाच्या 37 व्या वर्षी तेजश्री सिंगल आयुष्य जगत आहे. करिअरमध्ये स्थिरावलेली, आत्मविश्वासाने उभी असलेली तेजश्री बाहेरून आनंदी दिसत असली तरी तिच्या पोस्टमधून तिच्या संघर्षांची जाणीव होते. 'नशीबवान' या शब्दामागचं कठोर वास्तव तिने स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri Pradhan : बाहेरून #HappyLife, आतून संघर्ष! अनेक रात्री रडत झोपली, पहिल्यांदाच व्यक्त झाली तेजश्री प्रधान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल