Paatal Lok 2 Release Date :पुन्हा येतोय इन्स्पेक्टर हाथीराम, 'पाताल लोक 2' या दिवशी होणार रिलीज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Paatal Lok 2 release date announced : जयदीप अहलावतची मोस्ट अवेटेड 'पाताल लोक सीझन 2' ची रिलीज डेट समोर आली आहे. चाहते खूप दिवसांपासून त्याची वाट पाहत होते. 2025 मध्ये ही सीरिज OTT वर पाहायला मिळणार आहे.
advertisement
1/7

प्राइम व्हिडिओची पाताल लोक ही सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली. पाताल लोक या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.
advertisement
2/7
अखेर वर्षाच्या शेवटच्या दिवसात निर्मात्यांनी पाताल लोकच्या नव्या सीझनची अपडेट दिली आहे. पाताल लोकच्या दुसऱ्या सीझनच्या प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे.
advertisement
3/7
पाताळ लोकच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांना त्याच्या थरारक कथेने भुरळ घातली. पाताल लोक सीझन 2 मध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंग आणि गुल पनाग सारख्या प्रतिभावान कलाकारांचे पुनरागमन होणार आहे.
advertisement
4/7
तर तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर आणि जाह्नू बरुआ हे नवे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
5/7
पाताल लोक हा क्राईम ड्रामा 17 जानेवारी 2025 रोजी भारतासह 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर स्ट्रिम होणार आहे.
advertisement
6/7
इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी यांचे नवे पोस्टरही समोर आले आहे. ज्यात चेहऱ्याची एक बाजू दिसत असून मागे आग दिसत आहे.
advertisement
7/7
जयदीप अहलावतचा 'पाताळ लोक' 2020 साली प्रदर्शित झाला. पहिल्या सीझनला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तब्बल 4 वर्षांनी याचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Paatal Lok 2 Release Date :पुन्हा येतोय इन्स्पेक्टर हाथीराम, 'पाताल लोक 2' या दिवशी होणार रिलीज