TRENDING:

Prajakta Mali : 15 दिवसांच्या ब्रेकनंतर प्राजक्ताने आता दाखवला आपला 'खरा अवतार'; म्हणाली Real Me, चाहतेही पाहतच राहिले

Last Updated:
Prajakta Mali Photo : सोशल मीडियावर एक्टिव्ह असणारी प्राजक्ता माळी गेली काही दिवस गायब झाली होती आता ती पुन्हा आली आहे आणि तिने आपला खरा अवतार दाखवला आहे.
advertisement
1/7
15 दिवसांच्या ब्रेकनंतर प्राजक्ताने आता दाखवला आपला 'खरा अवतार'; म्हणाली Real Me, चाहतेही पाहतच राहिले
सतत सोशल मीडियावर एक्टिव्ह असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी, जी काही दिवसांपूर्वी 15 दिवसांसाठी गायब झाली होती. आपण पुढचे 15 दिवस नॉट रिचेबल असणार अशी माहिती तिने स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. त्यानंतर ती दिसलीच नाही.
advertisement
2/7
बरोबर 15 दिवसांनी प्राजक्ता समोर आली. सोशल मीडियावर तिने आपला फोटो पोस्ट केला. 15 दिवस मोबाईल नाही, सोशल मीडियावर एक्टिव्ह नाही, ती कुठे गेली होती, काय करत होती. याची सगळी माहिती तिने दिली होती. 
advertisement
3/7
प्राजक्ता श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळुरूमधील आश्रमात गेली होती. जिथं तिला फोन वापरण्याची आणि बाहेरचं काहीही खाण्याची परवानगी नव्हती. तिथं तिने  आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅप्पीनेस प्रोग्रामचा कोर्स केला. 15 दिवसांचं तीव्र शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रशिक्षण तिने पूर्ण केलं.
advertisement
4/7
हॅप्पीनेस प्रोग्रामची ती शिक्षिका झाल्याचं आणि लवकरच शिकवायला सुरुवात करणार असल्याचं तिने सांगितलं. तसंचफिल्म इंडस्ट्री सोडणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.
advertisement
5/7
यानिमित्ताने का होईना पण सतत सोशल मीडियावर असणाऱ्या प्राजक्ताने 15 दिवस डिजीटल डिटॉक्स केलं. पण आता मात्र ती पुन्हा आपल्या खऱ्या अवतारात परतली आहे.
advertisement
6/7
प्राजक्ताने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तिचे पिंक ड्रेसमधील ग्लॅमरस असे फोटो टाकले आहेत. याला Real Me असं कॅप्शन दिलं आहे.
advertisement
7/7
प्राजक्ताला हे फोटो अनेकांना आवडले आहेत. काहींनी तिला शुक्राची चांदणी, काहींनी मराठी क्विन, तर काहींनी मराठी बार्बी डॉल म्हटलं आहे. तसंच ती सोशल मीडियावर परतल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे, त्यांनी तिचं स्वागत केलं आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : 15 दिवसांच्या ब्रेकनंतर प्राजक्ताने आता दाखवला आपला 'खरा अवतार'; म्हणाली Real Me, चाहतेही पाहतच राहिले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल