TRENDING:

Grapes : द्राक्षांवरील पांढरा थर आणि केमिकल कसे स्वच्छ करायचं? फक्त पाण्याने धूवून फायदा नाही, ही आहे योग्य पद्धत

Last Updated:
Right Way To Clean Grapes : द्राक्षांवर असलेला हा थर केवळ नैसर्गिक मेण नसून, त्यावर केलेली कीटकनाशकांची फवारणी असू शकते. ही रसायने पोटात गेल्यास उलट्या, जुलाब किंवा दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
1/10
 Grapes : द्राक्षांवरील पांढरा थर आणि केमिकल कसे स्वच्छ करायचं? फक्त पाण्याने धूवून फायदा नाही, ही आहे योग्य पद्धत
द्राक्षांचा हंगाम सुरू झाला की बाजारात ठिकठिकाणी रसाळ द्राक्षे दिसू लागतात. मात्र, द्राक्षे खरेदी करताना त्यावर एक पांढऱ्या रंगाचा थर आपल्याला स्पष्ट दिसतो. अशावेळी लोक द्राक्ष आवर्जून धूवून खातात. पण फक्त पाण्याखाली धुणं पुरेसं नाही. जर तुम्ही ही असं करत असाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते.
advertisement
2/10
द्राक्षांवर असलेला हा थर केवळ नैसर्गिक मेण नसून, त्यावर केलेली कीटकनाशकांची फवारणी असू शकते. ही रसायने पोटात गेल्यास उलट्या, जुलाब किंवा दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
3/10
द्राक्षे पूर्णपणे रासायनिक मुक्त (Chemical Free) करण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करा:
advertisement
4/10
1. मीठ आणि कोमट पाण्याचा वापर (सर्वात प्रभावी पद्धत)मीठ हे नैसर्गिक जंतुनाशक आहे.कसे करावे: एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात 2 चमचे खडे मीठ किंवा साधे मीठ टाका.द्राक्षाlचे घड या पाण्यात 10 ते 15 मिनिटे बुडवून ठेवा. त्यानंतर हाताने हलके चोळून द्राक्षे स्वच्छ करा आणि शेवटी साध्या पाण्याने धुवून घ्या.
advertisement
5/10
2. बेकिंग सोडा (Baking Soda) पद्धतविज्ञानानुसार, बेकिंग सोडा अनेक प्रकारच्या जहाल कीटकनाशकांचा प्रभाव कमी करण्यास मदत करतो.कसे करावे: थंड पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा.या द्रावणात द्राक्षे 5 मिनिटे ठेवा.यामुळे द्राक्षांवरील चिकट थर आणि रसायने सहज निघून जातात.
advertisement
6/10
3. व्हिनेगरचा (Vinegar) वापरजर तुम्हाला द्राक्षे दीर्घकाळ टिकवायची असतील आणि ती निर्जंतूक करायची असतील, तर व्हिनेगर सर्वोत्तम आहे.कसे करावे: 3 भाग पाणी आणि 1 भाग व्हिनेगर असे मिश्रण तयार करा.या मिश्रणात द्राक्षे काही वेळ ठेवा. यामुळे बॅक्टेरिया आणि रसायने दोन्ही नष्ट होतात.
advertisement
7/10
4. गव्हाचे पीठ किंवा तांदळाचे पीठ ही एक पारंपारिक आणि प्रभावी पद्धत आहे. कसे करावे: द्राक्षांवर थोडे गव्हाचे पीठ टाका आणि हलक्या हाताने चोळा. पीठ द्राक्षांवरील चिकट रसायने शोषून घेते. त्यानंतर पाण्याने धुतल्यास द्राक्षे आरशासारखी चमकू लागतील.
advertisement
8/10
द्राक्षे धुताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा पूर्ण घड धुण्यापेक्षा द्राक्षांचे छोटे छोटे भाग करून धुतल्यास आतपर्यंत स्वच्छता होते. द्राक्षे धुवून फ्रीजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होतात. त्यामुळे जेव्हा खायची असतील, तेव्हाच वरील पद्धतींनी धुवावीत. जोपर्यंत द्राक्षांचा मूळ गडद रंग (हिरवा किंवा काळा) दिसत नाही, तोपर्यंत ती स्वच्छ करा.
advertisement
9/10
फळे खाणे आरोग्यासाठी उत्तमच आहे, पण ती स्वच्छ करण्याची पद्धत चुकीची असेल तर फायद्याऐवजी तोटाच जास्त होतो. त्यामुळे आजच ही माहिती आपल्या परिवारासोबत शेअर करा.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Grapes : द्राक्षांवरील पांढरा थर आणि केमिकल कसे स्वच्छ करायचं? फक्त पाण्याने धूवून फायदा नाही, ही आहे योग्य पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल