TRENDING:

Prajakta Mali : फिल्म इंडस्ट्री सोडून जाणार नाही! 15 दिवस गायब, अचानक समोर आली प्राजक्ता माळी; असं का म्हणाली?

Last Updated:
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या 15 दिवसांपासून सोशल मीडियावरून गायब होती. तिनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं मी फिल्म इंडस्ट्री सोडून जाणार नाहीये, असं म्हटलं आहे.
advertisement
1/9
फिल्म इंडस्ट्री सोडून जाणार नाही! 15 दिवसांनी समोर आली प्राजक्ता माळी; असं का म्हणाली?
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. पण गेली 15 दिवस प्राजक्ता सोशल मीडियावरून गायब झाली होती.
advertisement
2/9
प्राजक्ता माळी 15 दिवस नॉट रिचेबल होती. ती नेमकी कुठे गेली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. पण आता प्राजक्ता माळी पुन्हा रिचेबल झाली आहे.
advertisement
3/9
सोशल मीडियावर परत येताच प्राजक्ता माळीनं पोस्ट शेअर करत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. अजिबात फिल्म इंडस्ट्री सोडून जाणार नाहीये, असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. 15 दिवसांनी रिचेबल होताच प्राजक्ता माळी असं का म्हणतेय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
4/9
प्राजक्ता माळी गेल्या 15 दिवसांपासून बंगळुरूमधील श्री श्री रवीशंकर यांच्या आश्रमात एका खास कोर्ससाठी गेली होती. 15 दिवस फोनशिवाय तिनं एक महत्त्वाचा कोर्स पूर्ण केला.
advertisement
5/9
प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "मी Art of Living च्या Happiness Programme ची शिक्षिका झाले आहे. 15 दिवसांचं तीव्र शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रशिक्षण पूर्ण केलं. या काळात फोन वापरता आला नाही आणि बाहेरचं अन्नही खाल्लं नाही."
advertisement
6/9
"दररोज पद्मसाधना केली (ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे.) आणि अजून बरंच काही अनुभवलं, जे शब्दांत सांगणं कठीण आहे. हो मी लवकरच शिकवायला सुरुवात करणार आहे. Stay tuned."
advertisement
7/9
पोस्टच्या शेवटी प्राजक्तानं तळटीप लिहित म्हटलंय, "मी अजिबात फिल्म इंडस्ट्री सोडून कुठेही जाणार नाही. गेल्या 8 वर्षांप्रमाणेच या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणार आहे."
advertisement
8/9
प्राजक्ताच्या पोस्टवरून कळलंच असेल की, ती आता आर्ट ऑफ लिविंगचीशी शिक्षिका झाली आहे. असं असलं तर अभिनय क्षेत्रातील तिचं काम ती करत राहणार आहे.
advertisement
9/9
प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात होस्ट म्हणून काम करतेय. काही दिवसांआधी तिची देवखेळ ही वेब सीरिज रिलीज झाली. येत्या काळात तिचे आगामी सिनेमे पाइप लाइनमध्ये आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : फिल्म इंडस्ट्री सोडून जाणार नाही! 15 दिवस गायब, अचानक समोर आली प्राजक्ता माळी; असं का म्हणाली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल