TRENDING:

Video: चटके दिले, मारहाण केली अन् ५ वर्षे नको नको ते केलं! कीर्तनकार गुंजाळ महाराजचा खरा चेहरा समोर

Last Updated: Mar 16, 2026, 19:22 IST

Kirtankar News | अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडलीये. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय... आरोपीने पिडितेला मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विरोध केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता. १० मार्चला आरोपीने मुलीला घरी बोलावून मारहाण करत गरम लोखंडी पक्कडीने चटके देत पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने हा प्रकार भावाला सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीये. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये..

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
Video: चटके दिले, मारहाण केली अन् ५ वर्षे नको नको ते केलं! कीर्तनकार गुंजाळ महाराजचा खरा चेहरा समोर
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल