छोटा शकीलनं दिली सुपारी अन् हास्यजत्रेतील या अभिनेत्यानं 14 व्या वर्षी वडीलांना गमावलं; झाली नाही शेवटची भेट
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
हास्यजत्रेतून अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या एका अभिनेत्याची वैयक्तिक कहाणी मात्र खूपच हृदयद्रावक आहे. या अभिनेत्याच्या वडिलांची हत्या झाली होती. त्यानं एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता.
advertisement
1/8

हास्यजत्रेतून अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या एका अभिनेत्याची वैयक्तिक कहाणी मात्र खूपच हृदयद्रावक आहे. या अभिनेत्याच्या वडिलांची हत्या झाली होती. त्यानं एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता.
advertisement
2/8
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहचलेल्या प्रसाद खांडेकरच्या आयुष्यात वडिलांचा सहवास फार कमी मिळाला. त्याच्या वडिलांची हत्या झाली होती. त्याला छोटा शकील जबाबदार होता.
advertisement
3/8
महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, प्रसाद खांडेकरचे वडिल हे बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक होते. प्रसाद खांडेकरांच्या वडिलांच्या हत्येला छोटा शकील जबाबदार होता. मागील वर्षी पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्याने त्याच्या वडिलांच्या हत्येविषयी खुलासा केला होता.
advertisement
4/8
प्रसादच्या वडिलांच्या मृत्यूला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. 15 एप्रिल 1999 रोजी त्यांची हत्या झाली होती. वडील गेले त्यादिवशी प्रसादची त्याच्या वडिलांशी भेट होऊ शकली नाही याची खंत त्याच्या मनात अजूनही आहे.
advertisement
5/8
प्रसादने अभ्यासासह इतरही पुस्तकं वाचावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा. त्यामुळे त्यांनी त्याचं नाव बोरिवलीच्या ग्रंथालयात टाकलं होतं. मात्र तो तिथून फक्त गोष्टींची पुस्तकं वाचायचा. त्यावर त्याचे वडील रागावले आणि त्याला 'सोनेरी टोळी' हे पुस्तक वाचायला सांगितलं. एके दिवशी प्रसादला ते पुस्तक मिळालं आणि आनंदात तो वडिलांना ते पुस्तक दाखवायला गेला.
advertisement
6/8
15 एप्रिल 1999 हा तो दिवस. बाबांना पुस्तक दाखवायचं म्हणून प्रसाद उत्साहात घरी बाबांची वाट पाहत बसला होता. मात्र बाबा कामाला गेलेले. त्यांची दुधाची डेरी देखील होती. ते कामावरून मग डेरीवर जातील म्हणून प्रसाद डेरीवर गेला. डेरीत गेल्यावर त्याला कळलं की बाबा घरी गेलेत, म्हणून तो त्याची सायकल घेऊन घरी गेला. पण घरी गेल्यावर त्याला कळलं की बाबा शाखेत गेलेत. पण तिथेही गेल्यावर त्याच्या पदरी तेव्ह निराशाच आली.
advertisement
7/8
प्रसाद वडिलांना भेटायला शाखेत गेला. पण त्याला कळलं की बाबा दुसऱ्या दिवशी सेनेचा भगवा सप्ताह सुरु होणार त्याच्या तयारीसाठी गेलेत. प्रसाद बाबांना शोधत तिथे गेला, पण तिथे गेल्यावर त्याला कळलं की, बाबा तिथून घरी गेले आहेत.
advertisement
8/8
बाबांना पुस्तक दाखवायचं म्हणून प्रसाद फिरत होता, पण त्याची वडिलांची भेट कधी होऊच शकली नाही. त्याच रात्री त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी आली आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
छोटा शकीलनं दिली सुपारी अन् हास्यजत्रेतील या अभिनेत्यानं 14 व्या वर्षी वडीलांना गमावलं; झाली नाही शेवटची भेट