TRENDING:

1982चा तो हिट सिनेमा, दाखल झाल्या 34 केस, तरीही तिकिट खिडकीच्या बाहेर लागल्या होत्या रांगा

Last Updated:
1982 साली अशा एक सिनेमा रिलीज झाला होता ज्या सिनेमाची खूप चर्चा झाली. हल्ली सोशल मीडियावर अनेक सिनेमे बॉयकॉट केले जातात. पण जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा देखील काही सिनेमे बॉयकॉट केले गेले होते. बॉलिवूडच्या या सिनेमाच्या रिलीजवेळी अनेक रुढिवादी मुस्लिमांना सिनेमाच नाव आणि सिनेमाची कथा आवडली नव्हती.
advertisement
1/7
1982चा तो हिट सिनेमा, दाखल झाल्या 34 केस, तरीही थिएटर होतं हाऊसफुल्ल
42 वर्षांआधी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या एका सिनेमामुळे खूप विवाद निर्माण झाले होते. बी आर चोप्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.
advertisement
2/7
1982 साली राज बब्बर, दीपक पराशर आणि सलमा आगा यांचा निकाह हा सिनेमा रिलीज झाला होता. तिहेरी तलाकवर आधारित हा सिनेमा होता.
advertisement
3/7
तिहेरी तलाकावर आधारित हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता. रुढिवादी मुस्लिमांच्या भावना दुखवल्याचा आरोप त्यांनी केला होता. सिनेमाला कितीही विरोध झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं तगडी कमाई केली.
advertisement
4/7
जितका या सिनेमाला विरोध करण्यात आला तितकाच चांगला प्रतिसाद देखील या सिनेमाला मिळाला. सिनेमातील गाणी आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. सिनेमातील काही गाणी आजही प्रसिद्ध आहेत. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी तिकिट खिडकीच्या बाहेर रांगा लावल्या होत्या. अनेक शो हाऊसफुल झाले होते.
advertisement
5/7
या सिनेमातून अभिनेत्री सलमा आगा हिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. एका सिनेमानं तिनं रातोरात स्टार बनवलं. असं असलं तरी तिच्या पहिल्याच सिनेमाविरोधात 34 केस दाखल करण्यात आल्या होत्या.
advertisement
6/7
तिहेरी तलाक सारख्या नाजूक विषयावर सिनेमा तयार करणं हे बी आर चोप्रा यांच्यासाठी सोप्प नव्हतं. सिनेमा बॅन व्हावा यासाठी अनेक संघटनांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. अनेक मुस्लिम संघटनांनी थिएटरबाहेर सिनेमाविरोधात पोस्टर लावले होते.
advertisement
7/7
एकीकडे तडाडून विरोध होत असताना दुसरीकडे थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना तिकिट मिळत नव्हते. 4 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमानं 9 कोटींची कमाई केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
1982चा तो हिट सिनेमा, दाखल झाल्या 34 केस, तरीही तिकिट खिडकीच्या बाहेर लागल्या होत्या रांगा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल