TRENDING:

मराठवाड्याची मुलगी म्हणून हिणवलं, राजश्री देशपांडे पुणेकरांसाठी बनलेली चेष्टेचा विषय, पण ही व्यक्ती धावली मदतीला, अन्...

Last Updated:
Rajshri Deshpande : 'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2026'मध्ये राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेत असलेल्या 'बाप्या' या सिनेमाची अधिकृत निवड झाली होती. राजश्रीचं पुण्याबद्दल भावनिक नातं आहे. नुकतंच तिने याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
advertisement
1/7
राजश्री देशपांडे पुणेकरांसाठी बनलेली चेष्टेचा विषय, पण ती व्यक्ती धावली मदतीला
मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे नुकतीच 'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2026'मध्ये स्पॉट झाली. तिच्या 'बाप्या' या सिनेमाची या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृत निवड करण्यात आली होती. राजश्रीचं पुण्यासोबत एक वेगळं नातं आहे. दरम्यान तिने पुण्याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
advertisement
2/7
पुण्याबद्दल लिहिताना राजश्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"पुण्यासोबत माझं एक वेगळंच 'लव्ह-हेट' असं नातं आहे. सुरुवातीचे पुण्यातील माझे दिवस खूप आव्हानात्मक होते. त्यावेळी मी घाबरलेली आणि अस्वस्थ असायचे. काही लोकांमुळे तर मी आणखी खचले".
advertisement
3/7
राजश्रीने लिहिलं आहे,"मी मराठवाड्यातून आलेली असल्याने माझ्या एकंदरीत वागणुकीबद्दल मला जर्ज केलं गेलं. लोकांसाठी मी हसण्याचा विषय बनले होते. त्यावेळी घडणाऱ्या या सर्व गोष्टी खूप दुखावणाऱ्या होत्या".
advertisement
4/7
राजश्री म्हणते म्हणते,"पण सर्वच लोक तशी नव्हती. काही चांगली माणसंही होती. या माणसांनी मला माणुसकी आणि आपुलकी दिली. यातीच एक म्हणजे समर नखाते सर. औरंगाबादहून पुण्यात आलो त्या पहिल्या दिवसापासून ते माझे मार्गदर्शक आहेत. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला, मला धैर्य दिलं आणि आशा दिली. "सगळं नीट होईल. या प्रवासात आनंद शोधत राहा. हा प्रवास मोलाचा आहे. फक्त पुढे चालत राहा".
advertisement
5/7
राजश्री पुढे म्हणते,"आणि आज मी इथे आहे. त्यांना पुन्हा भेटणं खूपच सुंदर होतं. रूपाली हॉटेलच्या कॉफी आणि नाश्त्यासोबत पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये रमणं खूप भावूक करणारा अनुभव होता".
advertisement
6/7
PIFF मध्ये 'बाप्या'ची निवड झाल्याबद्दल राजश्री म्हणते,"आमच्या #Baapya चित्रपटाला फेस्टिव्हलच्या स्पर्धा विभागात स्थान दिल्याबद्दल @piffindia चे मनापासून आभार. सिनेमा नावाची जादू घडवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या तुमच्या लाडक्या टीमसोबत फिल्म फेस्टिव्हलचा भाग होणं नेहमीच आनंददायी असतं".
advertisement
7/7
राजश्री देशपांडेचा 'बाप्या' या सिनेमाची कथा दापोली येथील एका लहान मासेमार कुटुंबाभोवती फिरणारी आहे. कुटुंबातील नातेसंबंध, समाजातील दृष्टीकोन आणि वैयक्तिक संघर्ष यांचा हळुवार वेध घेणारी ही गोष्ट आहे. भावनिक संवेदनशीलता, विनोद आणि सामाजिक भाष्य यांचा समतोल साधत हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातो. या चित्रपटाची निर्मिती मुक्तल तेलंग आणि समीर तेवारी यांनी केली असून गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी यांच्या ‘बाप्या’ मध्ये प्रमुख भूमिका आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मराठवाड्याची मुलगी म्हणून हिणवलं, राजश्री देशपांडे पुणेकरांसाठी बनलेली चेष्टेचा विषय, पण ही व्यक्ती धावली मदतीला, अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल