सलमानची प्रेयसी नाही तर बहीण होणार होती ऐश्वर्या; पण सुपरस्टारमुळं थोडक्यात वाचला भाईजान
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांनी 1999 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतर त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. पण तुम्हाला माहितीये का ऐश्वर्या राय बच्चन एका चित्रपटात सलमान खानच्या बहीणीची भूमिका साकारणार होती. खुद्द ऐश्वर्यानं तिच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
advertisement
1/8

1999 मध्ये आलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या जोडीने खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट खूप हिट झाला होता. पण या चित्रपटानंतर ऐश्वर्या 2000 साली एका चित्रपटात सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारणार होती.
advertisement
2/8
'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट जोडी म्हटलं जाऊ लागलं. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री पाहून त्यांच्या लिंक-अपच्या बातम्यांनीही वेग आला होता.
advertisement
3/8
पण 2000 साली दोघेही एका चित्रपटात भाऊ आणि बहिणीच्या भूमिकेत दिसणार होते.
advertisement
4/8
2000 साली आलेल्या त्या चित्रपटाचं नाव होतं 'जोश'. या चित्रपटात ऐश्वर्याने शाहरुख खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात चंद्रचूरण सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. मात्र शाहरुखच्या आधी आमिर आणि सलमान या चित्रपटात कास्ट होणार होते.
advertisement
5/8
ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात दोघांना पहिल्यांदा 1999 मध्ये कास्ट करण्यात आलं होतं. यानंतर 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'हम तुम्हारे हैं सनम' मध्येही दोघे एकत्र दिसले होते.
advertisement
6/8
या चित्रपटात शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसले होते. मात्र सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी साईड रोल केले होते. पण 'जोश' मध्ये शाहरुखऐवजी सलमानची बहीण होणार होती.
advertisement
7/8
Reddit वर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने खुलासा केला होता की, 'जोश' या चित्रपटात सलमान आणि आमिर सुरुवातीला मुख्य भूमिका साकारणार होते. पण नंतर ऐश्वर्याने शाहरुखच्या बहिणीची भूमिका साकारली.
advertisement
8/8
या चित्रपटात शाहरुखच्या बहिणीची भूमिका साकारण्यास तिला कोणतीही अडचण नसल्याचं खुद्द ऐश्वर्यानं तिच्या मुलाखतीत सांगितलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलमानची प्रेयसी नाही तर बहीण होणार होती ऐश्वर्या; पण सुपरस्टारमुळं थोडक्यात वाचला भाईजान