Aishwarya Rai: ऐश्वर्या राय गेल्या 17 वर्षांपासून 'या' अभिनेत्याला बांधते राखी, कोण आहे 'तो'?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Aishwarya Rai: रक्षाबंधन म्हणजे केवळ रक्ताच्या नात्यातील बंध नव्हे, तर मनाच्या गाभाऱ्यात जपलेल्या आपुलकीचा सण. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि तिच्या मानलेल्या भावाचं नातं.
advertisement
1/7

रक्षाबंधन म्हणजे केवळ रक्ताच्या नात्यातील बंध नव्हे, तर मनाच्या गाभाऱ्यात जपलेल्या आपुलकीचा सण. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि तिच्या मानलेल्या भावाचं नातं. गेल्या 17 वर्षांपासून ऐश्वर्या एका अभिनेत्याला राखी बांधत आली आहे.
advertisement
2/7
एका सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्याने भावाची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्यालाच भाऊ मानलं आणि राखी बांधली होती. तेव्हापासून आजतागायत त्यांचं नातं सख्ख्या नात्याच्या वर झालं.
advertisement
3/7
2008 मध्ये ‘जोधा अकबर’ चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या जोधाबाईची भूमिका करत होती. त्यावेळी सोनू सूद तिचा भाऊ कुंवर सुजमल साकारत होता. पडद्यावरचं हे भावनिक नातं हळूहळू खऱ्या आयुष्यात उतरल.
advertisement
4/7
एका दिवशी सेटवर ऐश्वर्याने सोनूला राखी बांधली आणि त्या क्षणापासून हे नातं पक्कं झालं. तेव्हापासून दरवर्षी रक्षाबंधनाला ऐश्वर्या सोनूला राखी बांधते. गेल्या 17 वर्षापासून तिनं सोनूला भाऊ मानलं असून ती त्याला राखी बांधते. मात्र हे फार कमी लोकांना माहित आहे.
advertisement
5/7
सोनूने एका मुलाखतीत याविषयी सांगितलं. तो म्हणाला, “शूटिंगच्या सुरुवातीला ऐश्वर्या थोडी शांत होती. पण एका सीनदरम्यान तिने अचानक सांगितलं, ‘तुम्ही मला माझ्या वडील (अमिताभ बच्चन) आठवण करून देता.’ तेव्हापासून ती मला प्रेमाने ‘भाई साहब’ म्हणू लागली.”
advertisement
6/7
सोनू आणि बच्चन कुटुंबाचे संबंधही खास आहेत. त्याने अमिताभ बच्चनसोबत ‘बुद्धा... होगा तेरा बाप’मध्ये, तर अभिषेक बच्चनसोबत ‘युवा’ आणि ‘हॅपी न्यू इयर’मध्ये काम केलं आहे. पडद्यावरच्या भूमिकांपलीकडेही बच्चन कुटुंबाशी त्याची मैत्री तितकीच घट्ट आहे.
advertisement
7/7
सोनू म्हणतो, “बच्चन कुटुंब खरंच अद्भुत आहे. त्यांच्यासोबत काम करणं हा नेहमीच आनंदाचा अनुभव असतो.” ऐश्वर्या आणि सोनी सख्खे भाऊ बहिण नसले तरी त्यांच्यातील हे मानलेलं नातं तेवढंच खास आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aishwarya Rai: ऐश्वर्या राय गेल्या 17 वर्षांपासून 'या' अभिनेत्याला बांधते राखी, कोण आहे 'तो'?