ना एक्शन, ना रोमान्स; या प्राण्यावर बनवली फिल्म; शेवट पाहून येईल डोळ्यात पाणी
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
दाक्षिणात्य चित्रपट म्हटलं की डोळ्यासमोर फक्त ॲक्शन चित्रपट येतात. साऊथचे अनेक ॲक्शन चित्रपट लोकप्रिय आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. आज आम्ही तुम्हाला एका दक्षिण भारतीय चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो पडद्यावर पाहिल्यानंतर प्रेक्षक ढसाढसा रडले होते.
advertisement
1/8

2/8
खूप कमी चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला अशा प्रकारे स्पर्श करू शकतात की पाहताच अश्रू वाहू लागतात.
advertisement
3/8
असाच एक चित्रपट म्हणजे 2022 साली प्रदर्शित झालेला ‘चार्ली 777’. विशेष गोष्ट म्हणजे त्यात नायिका नव्हती, हिरोचा स्वॅग नव्हता, रोमान्स नव्हता आणि ॲक्शनही नव्हती तरी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई केली होती.
advertisement
4/8
कोणतंही प्रमोशन न करता चित्रपटगृहात आलेल्या या चित्रपटाने खळबळ उडवून दिली होती. अनेकांनी हा चित्रपट एकापेक्षा जास्त वेळा पहिला.
advertisement
5/8
‘चार्ली 777’ हा चित्रपट एक सामान्य माणूस आणि कुत्रा यांच्यातील बॉन्डिंग दाखवतो. कालांतराने माणूस आपल्या कुत्र्याच्या प्रेमात कसा पडतो हे या चित्रपटात दाखवलं आहे.
advertisement
6/8
चित्रपटात रक्षित शेट्टीने 'धर्मा'ची मुख्य भूमिका साकारली आहे जो सुरुवातीला अतिशय उद्धट आणि उग्र स्वभावाचा आहे. कोणावर प्रेम करणं सोडा, तो कोणाशीही थेट बोलत नाही, परंतु कुत्रा त्याच्या आयुष्यात प्रवेश करताच सर्वकाही बदलतं.
advertisement
7/8
या चित्रपटाद्वारे रक्षित शेट्टीने स्वत:ला एक उत्तम कलाकार म्हणून पुन्हा एकदा सिद्ध केलं होतं. 'चार्ली 777' ने सगळ्यांचं मन जिंकलं होतं.
advertisement
8/8
अवघ्या 15 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या 'चार्ली 777' या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 102 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही हिंदीत Prime Video वर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना एक्शन, ना रोमान्स; या प्राण्यावर बनवली फिल्म; शेवट पाहून येईल डोळ्यात पाणी