Rashmika Mandanna : साऊथ स्टार रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत, नॅशनल क्रशला पेलवणार का हे शिवधनुष्य?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmika Mandanna Look In Chhava : 'छावा' या महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत साऊथ स्टार रश्मिका मंदाना दिसणार आहे.
advertisement
1/9

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छत्रपती' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
advertisement
2/9
या सिनेमाचा टीजर पाहिल्यानंतर सगळ्यांचीच उत्सुकता ताणली आहे. खरं तर हा चित्रपट डिसेंबर २०२४ मध्ये रिलीज होणार होता. मात्र 'पुष्पा' सोबत होणारी टक्कर पाहता निर्मात्यांनी या चित्रपटाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला.
advertisement
3/9
रश्मिका नुकतीच “पुष्पा २” मध्ये दिसली. तिच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १२२८.९० कोटींचा गल्ला जमवला आहे. अशातच तिने १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
advertisement
4/9
१४ फेब्रुवारी २०२५ ला 'छावा' चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अभिनेता विकी कौशल साकारणार असून महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत साऊथ स्टार रश्मिका मंदाना दिसणार आहे.
advertisement
5/9
या सिनेमाच्या टीजरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. जबरदस्त ॲक्शनने भरलेल्या या टीजरमधून चित्रपटातील थराराची एक झलक पाहायला मिळाली.
advertisement
6/9
काही दिवसांपूर्वी विकी कौशलने त्याच्या फर्स्ट लूकचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकतंच रश्मिका मंदानाचा मराठमोळ्या साजशृंगारात सजलेला पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. यावेळी ती अतिशय सुंदर आणि घरंदाज दिसत आहे.
advertisement
7/9
साऊथ स्टार आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला अशाप्रकारे मराठमोळ्या पारंपारिक पेहरावात पाहून प्रेक्षकांचा उत्साह खूपच वाढला आहे.
advertisement
8/9
काही वेळातच या फोटोवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. आता चित्रपटातील हे ऐतिहासिक पात्र सत्यात उतरवण्यात रश्मिकाला यश येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
9/9
महाराष्ट्राच्या महाराणीची भूमिका साकारणं हे खूपच अवघड काम आहे. मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षा तिला पूर्ण करता येणार आहेत का, तिला या व्यक्तिरेखेचा कणखरपणा आणि स्वाभिमान यांना न्याय देता येणार का हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika Mandanna : साऊथ स्टार रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत, नॅशनल क्रशला पेलवणार का हे शिवधनुष्य?