TRENDING:

रश्मिकाला लागली विजयच्या नावाची हळद, पहिली झलक समोर; उदयपूरमधील शाही थाटाचे डोळे दिपवणारे Exclusive Photos

Last Updated:
Vijay Deverakonda-Rashmika Mandanna: सोशल मीडियावर या जोडीने आपल्या हळदीचे काही निवडक फोटो शेअर केले असून, त्यातील साधेपणा आणि सौंदर्याने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे.
advertisement
1/8
रश्मिकाला लागली विजयच्या नावाची हळद, उदयपूरमधील Exclusive Photos
ज्या क्षणाची चाहते चातकासारखी वाट पाहत होते, तो सप्तरंगी सोहळा आता पिवळ्या धमक रंगात न्हाऊन निघाला आहे. साऊथचे स्टार्स विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना उद्या विवाहबंधनात अडकणार आहेत.
advertisement
2/8
नुकताच पार पडत असलेला त्यांचा हळदीचा कार्यक्रम एखाद्या स्वप्नवत सोहळ्यापेक्षा कमी नव्हता. सोशल मीडियावर या जोडीने आपल्या हळदीचे काही निवडक फोटो शेअर केले असून, त्यातील साधेपणा आणि सौंदर्याने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे.
advertisement
3/8
उदयपूरच्या निसर्गरम्य वातावरणात हा सोहळा पार पडला. सजावटीसाठी पारंपरिक पिवळ्या आणि केशरी झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला होता. मध्यभागी दोन लाकडी स्टूल ठेवले होते, ज्याभोवती गुलाबी गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा टाकला होता.
advertisement
4/8
विशेष म्हणजे, सजावटीमध्ये कुठेही भपका नव्हता, तर निसर्गाशी नातं सांगणारं एक शांत आणि प्रसन्न वातावरण तयार करण्यात आलं होतं. या हळदीच्या सोहळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे तिथल्या खास नावांच्या पाट्यांनी.
advertisement
5/8
एका बाजूला फुलांच्या सजावटीमध्ये 'Rushie' (रुशी) आणि दुसऱ्या बाजूला 'Vijay' (विजय) अशी नावं लिहिलेली होती. लिली आणि गुलाबाच्या फुलांच्या मध्ये असलेली ही नावंच या दोघांमधील प्रेमाची साक्ष देत होती.
advertisement
6/8
रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या पट्ट्यांचे टेबल क्लॉथ आणि त्यावरची पिवळी नॅपकिन्स एका आधुनिक डिझाइनची साक्ष देत होती.
advertisement
7/8
विजय आणि रश्मिका यांना प्राण्यांची खूप आवड आहे, हे त्यांच्या चाहत्यांना माहीतच आहे. त्यांच्या हळदीच्या बॅकड्रॉपवर दोन गोंडस कुत्रे कारमधून फिरताना आणि मावळत्या सूर्याचा आनंद घेतानाचं एक चित्र होतं.
advertisement
8/8
हे लग्न जरी खाजगी असलं, तरी विजयच्या जवळच्या मित्रांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. दिग्दर्शक तरुण भास्कर, अभिनेत्री ईशा रेब्बा आणि विजयच्या टीममधील काही महत्त्वाचे सदस्य या हळदीच्या सोहळ्यात धुमाल करताना दिसले. त्यांचे काही 'बिहाइंड द सीन' फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रश्मिकाला लागली विजयच्या नावाची हळद, पहिली झलक समोर; उदयपूरमधील शाही थाटाचे डोळे दिपवणारे Exclusive Photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल