TRENDING:

Air Ambulance Crash : टेकऑफनंतर 20 मिनिटांनी संपर्क तुटला, दिल्लीला जाणाऱ्या एअर ॲम्ब्युलन्ससोबत 7:34 ला काय घडलं?

Last Updated:
Jharkhand Air Ambulance Crash : रांचीहून दिल्लीला जाणारे एक चार्टर्ड विमान कोसळून भीषण अपघात झालाय. अवघ्या 23 मिनिटांत म्हणजेच 7:34 वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला.
advertisement
1/5
Air Ambulance Crash : टेकऑफनंतर 23 मिनिटांनी संपर्क तुटला, 7:34 ला काय घडलं?
झारखंडमधून धक्कादायक माहिती समोर आलीये. रांचीहून दिल्लीला जाणारे एक चार्टर्ड विमान कोसळून भीषण अपघात झाला असून, यामध्ये विमानातील सर्व 7 जणांचा मृत्यू झाला आहे. चार्टर्ड विमान रेडबर्ड कंपनीचे 'बीचक्राफ्ट किंग एअर B90L' मॉडेल असून ते एअर ॲम्ब्युलन्स म्हणून वापरले जात होते, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
2/5
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी 7:11 वाजता विमानाने रांची विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र, अवघ्या 23 मिनिटांत म्हणजेच 7:34 वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. त्यानंतर काही वेळातच हे विमान चतरा जिल्ह्यातील समरिया येथील घनदाट जंगलात कोसळले.
advertisement
3/5
DGCA ने दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे सकाळी 7:30 वाजता पायलटने मार्ग बदलण्याची म्हणजेच डायव्हर्जनची परवानगी मागितली होती. त्यानंतर अचानक विमानाचा कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि रडारवरून विमान गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
4/5
चत्रामधील जंगलात हे विमान कोसळल्याचे निष्पन्न झाले असून सध्या या अपघाताचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या अपघातात विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कोणालाही वाचवता आले नाही. त्यामुळे आता देशभरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतं.
advertisement
5/5
दरम्यान, लातेहार जिल्ह्यातील चंदवा येथील रहिवासी असलेले संजय कुमार 65 टक्के भाजले होते. त्यांच्यावर 16 फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते, मात्र अधिक उपचारांसाठी त्यांना दिल्लीला नेण्यात येत होते. रुग्णाच्या नातेवाईकांनीच या खासगी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती, पण नियतीला काही वेगळेच मान्य होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Air Ambulance Crash : टेकऑफनंतर 20 मिनिटांनी संपर्क तुटला, दिल्लीला जाणाऱ्या एअर ॲम्ब्युलन्ससोबत 7:34 ला काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल