T20 World Cup : वेस्ट इंडिजचा विजय धोक्याची घंटा, 5 कारणांमुळे टीम इंडिया सुपर-8 मधूनच बाहेर होणार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेवर 107 रननी दणदणीत विजय मिळवला आहे, पण वेस्ट इंडिजचा हा विजय टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे.
advertisement
1/5

सुपर-8 मध्ये रविवारी टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रननी पराभव झाला, त्यातच आता वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला 107 रननी धूळ चारली आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या नेट रनरेटला बुस्टर डोस मिळाला आहे. वेस्ट इंडिजचा नेट रनरेट +5.350 आणि दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट +3.800 आहे.
advertisement
2/5
दुसरीकडे टीम इंडियाचा नेट रनरेट मायनस 3.800 आहे, त्यामुळे आता टीम इंडियाला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मोठे विजय मिळवावे लागतील, ज्यामुळे त्यांचा नेट रनरेट दोन्ही टीमपेक्षा चांगला होईल.
advertisement
3/5
उरलेल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियासमोर वेस्ट इंडिजचं आव्हान तगडं असेल, कारण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजने त्यांचे सर्व 5 सामने फक्त जिंकलेच नाहीत, तर मोठ्या फरकाने जिंकले आहेत. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 1 मार्चला सामना होणार आहे.
advertisement
4/5
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बुमराह आणि अर्शदीप वगळता टीम इंडियाचे बॉलर अपयशी ठरले आहेत. आफ्रिकेच्या 3 विकेट गेलेल्या असतानाही भारतीय बॉलरना दबाव बनवता आला नाही, त्यामुळे वेस्ट इंडिजच्या हेटमायर, पॉवेल, रदरफोर्ड, शेफर्ड यांच्यासारख्या तडाखेबाज खेळाडूंसमोर भारतीय बॉलर्सचा निभाव कसा लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
5/5
दुसरीकडे टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इतिहासही टीम इंडियाच्या बाजूने नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत 4 मॅच झाल्या आहेत, यातल्या 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : वेस्ट इंडिजचा विजय धोक्याची घंटा, 5 कारणांमुळे टीम इंडिया सुपर-8 मधूनच बाहेर होणार?