थिएटरमध्ये प्रेक्षकांना ढसाढसा रडवलं, रेणुका शहाणेंचा 'उत्तर' सिनेमा आता OTT वर, रिलीज डेट समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Uttar Movie OTT Release : अभिनेत्री रेणूका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांचा 'उत्तर' हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमाची ओटीटी रिलीज डेट समोर आली आहे.
advertisement
1/8

काही सिनेमे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. अभिनेत्री रेणूका शहाणे यांचा एक सुंदर सिनेमा काही दिवसांआधी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या सिनेमाचं नाव होतं 'उत्तर'.
advertisement
2/8
आई आणि लेकाची हृदयस्पर्शी गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली होती. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. सिनेमा पाहत असताना कितीतरी आया आणि त्यांची मुलं ढसाढसा रडली. 'उत्तर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडला.
advertisement
3/8
थिएटरमध्ये प्रेक्षकांना ढसाढसा रडवणारा उत्तर हा सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार आहे. उत्तर सिनेमा ओटीटीवर रिलीज होतोय. सिनेमाची ओटीटी रिलीज डेट समोर आली आहे.
advertisement
4/8
रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांची आई लेकाची भावनिक कथा असलेला उत्तर सिनेमा आता झी 5 मराठी सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
5/8
वेळ आपल्या हातातून निसटून जाताना जीवन अशी उत्तरं मागते जी देण्यास आपण तयार नसतो. संवेदनशीलता, संयम आणि अस्सल भावनिक स्पष्टतेसह उत्तर ची कथा अजून उलगडत जाते.
advertisement
6/8
महत्त्वाकांक्षा आणि वाढत्या मौनामुळे आकार घेतलेले एक कोमल, गुंतागुंतीचे आई-मुलाचे नाते उत्तर मध्ये अनुभवयाला मिळणार आहे. उमा ( रेणूका शहाणे ) ही एक आई जिची उबदार माया शांतपणे तिच्या कुटुंबाला एकत्र ठेवते. निनाद ( अभिनय बेर्डे ) हा एक तरुण घरापासून जवळजवळ नकळत दूर जात असताना जीवनात पुढे जात असताना, स्वतःचा संघर्ष बाजूला ठेवून परिस्थितीला दोष न देता भावनिक अंतर पार करण्याच्या कसरतीत दिसतो.
advertisement
7/8
क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित आणि Zee स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित, 'उत्तर' मध्ये रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांच्या भूमिका अत्यंत प्रभावी आहेत. तसेच ह्रुता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका सिनेमात आहे. परिस्थिती आई आणि मुलाच्या नात्याला एका वळणावर आणत असताना, प्रेम, क्षमा आणि त्यांची भावनिक गोष्ट यातून बघायला मिळणार आहे.
advertisement
8/8
उत्तर हा सिनेमा हृदयस्पर्शी सिनेमा 13 फेब्रुवारी 2026 रोजी झी 5 मराठी वर रिलीज होणार आहे. उत्तर सिनेमानं थिएटरमध्ये 3 कोटींहून अधिक कमाई केली होती. थिएटरप्रमाणेच ओटीटीवरही उत्तर सिनेमा प्रेक्षक पसंती देतील अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
थिएटरमध्ये प्रेक्षकांना ढसाढसा रडवलं, रेणुका शहाणेंचा 'उत्तर' सिनेमा आता OTT वर, रिलीज डेट समोर