TRENDING:

Rinku Rajguru : मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही..! रिलेशनशिपबाबत रिंकू राजगुरूनं थेट सांगूनच टाकलं

Last Updated:
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या रिलेशनशिप स्टेटसवर भाष्य केलं आहे. रिंकूनं थेट सांगून टाकलं. नेमकं काय म्हणाली रिंकू?
advertisement
1/9
मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही..! रिलेशनशिपबाबत रिंकूनं थेट सांगूनच टाकलं
'सैराट'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूचे एकमागून एक सिनेमे येत आहेत. आधी रिंकूचा आशा हा सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर महिन्याभरातच तिचा 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा सिनेमा देखील रिलीज होतेय. या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
advertisement
2/9
रिंकूच्या अभिनयाचं आणि सिनेमांचं नेहमीच कौतुक होत असतं. यामुळे ती कायम चर्चेत राहिली आहे. पण याशिवाय रिंकूच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. रिंकू लग्न कधी करणार, तिचा बॉयफ्रेंड कोण याकडे सर्वांचं लक्ष लागून असतं.
advertisement
3/9
रिंकूनं आतापर्यंत अनेकदा बोलताना तिला कसा नवरा हवा आहे याविषयी बोलली आहे. जेन झी पिढीची असली तरी रिलेशनशिपबाबत तिचा दृष्टिकोन फारच टिपिकल असल्याचं दिसून आलं आहे. जेन झी पिढीच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन रिंकूला आवडत नाही असं तिनं अनेकदा सांगितलं.
advertisement
4/9
दरम्यान रिंकूने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणखी एक खुलासा केला आहे. जो ऐकून तिच्या चाहत्यांना आनंदही झालाय आणि थोडा शॉकही बसला आहे.
advertisement
5/9
रिंकूचा 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा सिनेमा 13 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. यानिमित्तानं एका मुलाखतींमध्ये रिंकूने तिच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं.
advertisement
6/9
भाडिपाला दिलेल्या मुलाखतीत रिंकू थेटच म्हणाली, "मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही. डायरेक्ट नवरा पाहिजे आपल्याला." तिचं हे वाक्य ऐकून समोर ऐकणारे सगळेच शॉक झाले.
advertisement
7/9
प्रेमाबद्दल बोलताना रिंकू तिच्या खास स्टाइलमध्ये म्हणाली, "माझे डोळे खूप खतरनाक आहेत, प्रेमात पडशील. भल्याभल्यांची वाट लागलीये. मी कधीच प्रेमात पडत नाही, लोक माझ्या प्रेमात पडतात."
advertisement
8/9
रिंकू राजगुरूचं नाव अभिनेता आकाश ठोसरबरोबर जोडलं गेलं. त्याचप्रमाणे कृष्णराज महाडिकबरोबर रिंकूचा एक फोटो समोर आला होता त्यानंतरही दोघांच्या नात्याबद्दल चर्चा झाली होती. मात्र दोघांमध्ये फक्त मैत्री असल्याचं समोर आलं. त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
advertisement
9/9
त्याचबरोबर रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते. रिंकूचे साडीतील फोटो तिच्या चाहत्यांना विशेष आवडतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही..! रिलेशनशिपबाबत रिंकू राजगुरूनं थेट सांगूनच टाकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल