Rinku Rajguru : केदारनाथ मंदिरासमोर पडून फुटली होती रिंकू राजगुरूची ढोपरं, त्या चुकीची मिळाली शिक्षा!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru Kedarnath Journey Experience : रिंकू राजगुरूने 2023 मध्ये केदारनाथ यात्रा केली. तिथे तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तिने केलेल्या चुकीची तिला शिक्षा मिळाली होती असं तिनं सांगितलं. तिने केलेली ती चुक होती तरी काय?
advertisement
1/8

माणसाच्या जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी केदारनाथची यात्रा करावी असं म्हणतात. अभिनेत्री रिंकू राजगुरू देखील केदारनाथला गेली होती. 2023 मध्ये रिंकूने केदारनाथ यात्रा केली होती.
advertisement
2/8
केदारनाथला गेल्यानंतर तिथल्या मंदिरासमोर पडून रिंकूची दोन्ही ढोपरं फुटली होती. रिंकूने स्वत: याबद्दल सांगितलं. तिने केलेल्या त्या चुकीची तिला तिथे शिक्षा मिळाली असंही तिनं सांगितलं.
advertisement
3/8
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रिंकू म्हणाली, "माझा देवावर विश्वास वगैरे असं काही तेव्हा नव्हतं. पण मला अचानक वाटलं की मला केदारनाथला जायचं आहे. गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी चालत केदारनाथला गेले होते. खूप थकले होते आणि पायही दुखत होते. दर्शन झाल्यावर मला वाटलं की, जातान मला चॉपर मिळावं. कारण दुसऱ्या दिवशी आमची फ्लाईट होती."
advertisement
4/8
"आम्ही खूप वेळ पाहिली. वाट बघून बघून शेवटी अंधार व्हायला लागला आणि मी देवाला म्हणाले की, मला हेलिकॉप्टर मिळूदे. मी माझ्या कुटुंबासह दर्शनाला येईन. नंतर एक माणूस आला आणि म्हणाला की, आता हेलिकॉप्टर मिळणार नाही. तेव्हा मी खूप रडत होते, चिडलेले."
advertisement
5/8
रिंकू पुढे म्हणाली, "मी खूप रडत होते आणि मी म्हटलं, 'काय तुझा हा देव. त्याला म्हटलं चॉपर दे, घरच्यांना तुझ्याकडे घेऊन येईन. पण तो ऐकतोय का. असं बोलत-बोलत पुढे जात होते तेव्हा मागून एक माणूस आला आणि म्हणाला, तुम्हाला जायचं आहे का, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का. फक्त दोनच सीट आहेत पायलटच्याइथे."
advertisement
6/8
"त्यानंतर मी आनंदात पळत पळत जात होते आणि इतक्यात जोरात पडले. माझा गुडघा फुटला. मी तेव्हा खूप वाईट वाईट बोलले होते शंकाराला. इतकंच कोण बोलतं. त्यानंतर मी देवाला म्हटलं की, मी इथून पुढे काही बोलणार नाही. मला इतक्या छोट्या गोष्टीची इथेच शिक्षा मिळाली."
advertisement
7/8
रिंकूनं सांगितलं, "चॉपरमध्ये फक्त दोन जागा होत्या. खूप माणसं वेटिंगवर होती. पण आम्हालाच का बोलावलं माहिती नाही. तिथूनच सगळं बदललं. माझा विश्वास बसला की, ती एक शक्ती आहे."
advertisement
8/8
"मी आधी नास्तिक होते. केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडाथोडा विश्वास बसायला लागला. मग मी उपवास वगैरे करत गेले आणि मला त्याचे काही अनुभवही आले."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : केदारनाथ मंदिरासमोर पडून फुटली होती रिंकू राजगुरूची ढोपरं, त्या चुकीची मिळाली शिक्षा!