Rohit Shetty : रोहित शेट्टीची 10 मजली इमारत; जिथं झाला गोळीबार किती आहे त्या 'शेट्टी टॉवर'ची किंमत?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rohit Shetty Building House Photo : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी त्याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारामुळे चर्चेत आला आहे. विशेषत: त्याची 10 मजली इमारत शेट्टी टॉवर जिने आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
1/7

सिंघम, गोलमाल, चेन्नई एक्स्प्रेस, सूर्यवंशी असे सुपरहिट चित्रपट देणारा दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी त्याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारामुळे चर्चेत आला आहे. शेट्टी टॉवर नावाची त्याची 10 मजली इमारत यामुळे त्याच्या बिल्डिंगबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे.
advertisement
2/7
रोहित शेट्टी हा केवळ एक कुशल दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माताच नाही तर तो अत्यंत श्रीमंत देखील आहे. त्याची एकूण संपत्ती अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. दिग्दर्शकाची नेटवर्थ सुमारे 280 कोटी असल्याचा अंदाज आहे.
advertisement
3/7
एका मुलाखतीत रोहितने सांगितलं होतं की, वयाच्या 17 व्या वर्षी त्याने काम करायला सुरुवात केली. त्याला फक्त 35 रुपये पगार मिळत असे. नंतर त्याने 'फूल और कांटे' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. हळूहळू कठोर परिश्रम करून त्याने इंडस्ट्रीत स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. तो बडा दिग्दर्शक बनला.
advertisement
4/7
सिंघम आणि सूर्यवंशीसारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर त्याने स्वतःचं प्रोडक्शन हाऊसदेखील सुरू केलं आहे. तो विविध ठिकाणी मालमत्तेत गुंतवणूक करताना देखील दिसतो.
advertisement
5/7
रोहित शेट्टी जो त्याच्या फिल्ममध्ये गाड्या दाखवतो, वैयक्तिक आयुष्यातही त्याला कार खूप आवडतात. त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज आणि फोर्ड मस्टँग जीटी यासारख्या महागड्या गाड्या आहेत, ज्यांची किंमत लाखो, कोट्यवधींच्या घरात आहे. (फोटो : सोशल मीडिया)
advertisement
6/7
रोहित शेट्टीचं घर म्हणजे साधंसुधं घर नाही तर एक बिल्डिंगच आहे. मुंबईच्या जुहूत तो 10 मजली इमारतीत राहतो, जी त्याच्याच मालकीची आहे.
advertisement
7/7
फार्म हाऊस वर्ल्डवरील माहितीनुसार बिल्डिंगच्या वरच्या दोन मजल्यांवर तो स्वत: राहतो. तर 4 मजल्यांवर त्याच्या लक्झरी कार्सचं कलेक्शन आहे. त्याच्या या प्रॉपर्टीची किंमत 45,000-80,000 रुपये प्रति स्क्वेअर फूट असल्याचं सांगितलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार या बिल्डिंगची किंमत अंदाजे 15 कोटी रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rohit Shetty : रोहित शेट्टीची 10 मजली इमारत; जिथं झाला गोळीबार किती आहे त्या 'शेट्टी टॉवर'ची किंमत?