आमची लेक..! आई मराठी TV ची सुपरहिट नायिका, लेकीनं डेब्यू फिल्मच मोठा पडदा गाजवला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीनं तिच्या लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. लेकीनं पदार्पणातच मोठ्या पडद्यावर आपली छाप सोडली आहे.
advertisement
1/10

मराठी टेलिव्हिजनची एकेकाळची सुपरहिट नायिका आजही मालिकाविश्वात सक्रीय आहे. अभिनेत्रीबरोबर आता तिची लेकही अभिनय क्षेत्रात आली आहे.
advertisement
2/10
आई मराठी टेलिव्हिजनची सुपरहिट नायिका होतीच आणि आता तिची लेक मोठा पडदा गाजवतेय. डेब्यू फिल्ममध्येच तिच्या लेकीला मोठा सन्मान मिळाला आहे.
advertisement
3/10
आपण बोलत आहोत अभिनेत्री ऋजुता देशमुख हिच्याबद्दल. ऋजुताची मुलगी अभिनेत्री साजिरी जोशी हिनं देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. पदार्पणताच तिनं मोठं यश मिळवलं आहे.
advertisement
4/10
साजिरी जोशीला तिच्या पदार्पणातील सिनेमासाठी झी चित्र गौरव सोहळ्यात एप्रिल मे 99 या सिनेमासाठी 'सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण अभिनेत्री' असा पुरस्कार मिळाला आहे. ऋजुता आणि तिचा नवरा दोघे स्वत: लेकीचं कौतुक पाहण्यासाठी उपस्थित होते.
advertisement
5/10
ऋजुतानं लेकीच्या अवॉर्ड शोचे फोटो शेअर करत अभिमानानं पोस्ट लिहिली आहे. ऋजुतानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण! पहिला चित्रपट, पहिलं बक्षीस, भरपूर कौतुक आणि प्रेक्षकांचा प्रेम."
advertisement
6/10
"आमच्या लेकीला 'साजिरी जोशी' हीला झी चित्र गौरव चा 'सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण अभिनेत्री' पुरस्कार मिळाला आहे! परीक्षकांचे, झी कुटुंबाचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार."
advertisement
7/10
"अत्यंत महत्त्वाची व्यक्ती रोहन म्हापूसकर आणि एप्रिल मे 99 ची संपूर्ण टीम यांच्या शिवाय हे अशक्य होतं.... तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार", असंही ऋजुतानं पोस्टच्या शेवटी लिहिलं आहे.
advertisement
8/10
'एप्रिल मे 99' या सिनेमानंतर साजिरीनं झी 5 वरील 'बाई तुझ्यापायी' या मराठी वेब सीरिजमध्येही काम केलं. सध्या ती स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या शोमध्ये अँकरिंग करतेय.
advertisement
9/10
एप्रिल मे 99 हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घडणाऱ्या मजेशीर घडामोडींवर आधारित सिनेमा आहे. गावाचे मित्र आणि त्यांची शहातून आलेली मैत्रीण, त्यांच्यातील मज्जा मस्ती या सिनेमात पाहायला मिळते. हा संपूर्ण सिनेमा कोकणात शूट करण्यात आला आहे. त्यामुळे लोकेशन्स आणि सिनेमेटोग्राफीबाबतीत हा सिनेमा सरसच आहे.
advertisement
10/10
साजिरी ही दिसायला डिट्टो अभिनेत्री ऋजुता देशमुखची कार्बन कॉपी आहे. तिच्याकडे पाहिल्यानंतर तरुणपणीची ऋजुता देशमुखचं प्रेक्षकांना आवडते. साजिरीला आणखी नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आमची लेक..! आई मराठी TV ची सुपरहिट नायिका, लेकीनं डेब्यू फिल्मच मोठा पडदा गाजवला