Bigg Boss 15: सलमानपेक्षा जास्त मानधन, करण कुंद्राच्या खुलाशाने इंडस्ट्रीत खळबळ! रक्कम ऐकून चाहत्यांना धक्का
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
टिव्ही इंडस्ट्रीमध्ये करण कुंद्रा हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक टिव्ही सीरियल्स आणि रिॲलिटी शोमध्ये काम केलं आहे. अनेक रिॲलिटी शोमधून चाहत्यांमध्ये फेमस झालेल्या करण कुंद्राने नुकतंच 'बिग बॉस 15' बद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. तो त्या शोमधला सर्वाधिक फी घेणारा सेलिब्रिटी ठरल्याचं स्पष्ट केलं आहे.
advertisement
1/7

करण कुंद्रा हा टिव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक टिव्ही सीरियल्स आणि रिॲलिटी शोमध्ये काम केलं आहे. अनेक रिॲलिटी शोमधून चाहत्यांमध्ये फेमस झालेल्या करण कुंद्राने नुकतंच 'बिग बॉस 15' बद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. तो त्या शोमधला सर्वाधिक फी घेणारा सेलिब्रिटी ठरल्याचं स्पष्ट केलं आहे.
advertisement
2/7
'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादवच्या पॉडकास्टमध्ये करणने हजेरी लावली होती. यावेळी त्याने तू आत्तापर्यंत सर्वाधिक मोठ्या रकमेचा चेक केव्हा घेतला आहेस? असा त्याने प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर बोलताना करणने मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. त्याच्या विधानाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत.
advertisement
3/7
एल्विश यादवच्या पॉडकास्टमध्ये करण कुंद्राने शोमधील त्याच्या फी बद्दलचा महत्त्वाचा खुलासा केलेला आहे. त्याने सांगितलं की, सर्वाधिक फी मागून मी बिग बॉसच्या इतिहासात माझं नाव कोरलं आहे. एवढी फी कोणत्याही कंटेस्टंटने आजवर मागितलेली नाही. जेव्हा एल्विशने करणला तुझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा चेक कोणता होता, असा प्रश्न विचारला.
advertisement
4/7
त्यावर करण म्हणाला की, "माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा चेक हा 'बिग बॉस 15'चा होता. सर्वाधिक मानधन घेणार्‍यांच्या यादीमध्ये माझं नाव बिग बॉसच्या इतिहासामध्ये कोरले आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, असण्याचा हा एक प्रसंग असावा. बिग बॉसची टीम माझ्यासोबत गेल्या काही वर्षांपासून बिग बॉसमध्ये येण्याबद्दल बोलत होते आणि तेव्हाच कोविड संपला होता."
advertisement
5/7
"तेव्हा मेकर्स म्हणत होते की, काहीही होऊद्या आम्हाला यंदाच्या सीझनमध्ये करण कुंद्रा हवा आहे. तर त्यांना मी जरा रागिट माणूस असल्याचं सांगितलं होतं. या कारणामुळे मला तुम्ही शोमध्ये घेऊ नका, असं त्यांना म्हणालो होतो. पण तरीही ते त्यांच्या मुद्द्यावर कायमच होते. आम्हाला चालेल." असं म्हणत त्यांनी करणला पुन्हा एकदा शोमध्ये येण्याची मागणी केली.
advertisement
6/7
"त्यांची विनंती मान्य करत, मी(करण) त्यांना हो म्हणालो. जेवढं मानधन तू मागितलंय, तेवढं मानधन आजवर कोणीही मागितलेलं नाही. सर्वात महागडा स्पर्धक आहेस तू, असं बिग बॉसचे मेकर्स आणि टीम मला म्हणाली होती. कारण, त्यावेळी मी कॅमेऱ्याच्या पाठी आणि सह निर्माता म्हणूनही काम करत होतो. त्यामुळे मला माहिती होतं, मानधन किती मागायला हवं." असं करण मुलाखतीमध्ये म्हणाला.
advertisement
7/7
बिग बॉस 15 मध्ये करण कुंद्रासोबत तेजस्वी प्रकाश सुद्धा होती. याच शोच्या माध्यमातून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची लव्हस्टोरी सुरू झाली. बिग बॉस 15 ची ट्रॉफी तेजस्वी प्रकाशने जिंकली होती. तेव्हापासून ते आजवर हे कपल कायमच प्रेक्षकांच्या नजरेत राहिलेले आहे. त्यांनी अनेक शोमध्ये एकत्रच एन्ट्री घेतली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 15: सलमानपेक्षा जास्त मानधन, करण कुंद्राच्या खुलाशाने इंडस्ट्रीत खळबळ! रक्कम ऐकून चाहत्यांना धक्का