केळं खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? चुकीच्या वेळी खाल्ल्यास होऊ शकतं नुकसान; जाणून घ्या शास्त्र काय सांगतं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना वाटतं की केळं कधीही खाल्लं तरी चालतं. पण तुम्हाला माहीत आहे का? केळं खाण्याची वेळ आणि ते किती पिकलेलं आहे, यावर त्याचे फायदे अवलंबून असतात.
advertisement
1/7

सकाळी घाईघाईत ऑफिसला निघताना असो किंवा व्यायामानंतर ऊर्जा मिळवण्यासाठी... आपल्यापैकी अनेकांच्या पिशवीत किंवा डायनिंग टेबलवर एक फळ आवर्जून असतं, ते म्हणजे 'केळं'. स्वस्त, मस्त आणि वर्षभर उपलब्ध असणारं हे फळ ऊर्जेचा पॉवरहाऊस मानलं जातं. पण, एवढं गुणकारी फळ खाताना आपण अनेकदा एक मोठी चूक करतो.
advertisement
2/7
अनेकांना वाटतं की केळं कधीही खाल्लं तरी चालतं. पण तुम्हाला माहीत आहे का? केळं खाण्याची वेळ आणि ते किती पिकलेलं आहे, यावर त्याचे फायदे अवलंबून असतात. चुकीच्या पद्धतीने खाल्लेली केळी तुमच्या आरोग्यासाठी फायद्याऐवजी तोट्याची ठरू शकतात. चला तर मग, केळं खाण्याचं नेमकं शास्त्र काय आहे ते समजून घेऊया.
advertisement
3/7
1. जास्त पिकलेलं की निबर? कोणतं केळं श्रेष्ठ?बाजारात गेल्यावर आपण सहसा रंगाने पिवळीधमक आणि मऊ केळी निवडतो. पण विज्ञानानुसार, अधवट पिकलेली (थोड्या कडक असलेल्या) केळी खाणे अधिक फायदेशीर ठरते.फायदा: अशा केळ्यांमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं आणि साखरेचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी असतं. यामुळे ती पचायला सोपी जातात आणि पोट बराच वेळ भरलेलं राहतं.
advertisement
4/7
काय काळजी घ्याल?साखर आणि इन्सुलिन: याउलट, केळं जास्त पिकलेलं असेल तर त्यातील नैसर्गिक शर्करा (Sugar) वाढते. यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी अचानक वाढू शकते, जी मधुमेही किंवा वजन कमी करणाऱ्यांसाठी चांगली नसते. तसेच जास्त पिकलेल्या केळ्यात फायबर कमी झाल्यामुळे त्याचे पूर्ण पोषण शरीराला मिळत नाही.
advertisement
5/7
2. केळं खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?सकाळी नाश्त्याला केळं खाणं हे शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी मानलं जातं. यामुळे रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित राहतो आणि पचनक्रिया सुधारते.काही लोकांना रिकाम्या पोटी दररोज केळं खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी केळं इतर पदार्थांसोबत (उदा. ओट्स किंवा सुका मेवा) खाणे उत्तम.
advertisement
6/7
3. रात्री केळं का टाळावं?लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना रात्री दूध-केळं घेण्याची सवय असते. मात्र, आयुर्वेदानुसार आणि आधुनिक विज्ञानानुसारही रात्री केळं खाणं टाळावं.रात्रीच्या वेळी आपली पचनसंस्था मंदावते, त्यामुळे केळं पचायला जड जाऊ शकतं.सर्दी-खोकला: रात्री केळं खाल्ल्याने कफ वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास उद्भवू शकतो.
advertisement
7/7
4. केळ्याचे काही खास फायदे:यात कॅलरीज कमी असल्या तरी पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6 आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं.झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी हे सर्वोत्तम फळ आहे.फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.थोडक्यात सांगायचे तर केळं हे खरोखरच 'सुपरफूड' आहे, पण ते योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात खाल्ल्यास तुमचं शरीर तुम्हाला धन्यवाद देईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
केळं खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? चुकीच्या वेळी खाल्ल्यास होऊ शकतं नुकसान; जाणून घ्या शास्त्र काय सांगतं