TRENDING:

पाकिस्तानविरुद्ध राडा झाला, त्यावरूनच आता कौतुक, टीम इंडियाने सुधारली गेम चेंजर चूक, Video

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेली मोठी चूक सुधारली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँडविरुद्ध मोठा स्कोअर केला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 193 रन केले. शिवम दुबेने 31 बॉलमध्ये 66 रनची वादळी खेळी केली, तर हार्दिक पांड्याने 21 बॉलमध्ये 30 रन केले. याशिवाय सूर्यकुमार यादवने 34 आणि तिलक वर्माने 31 रनची खेळी केली.
पाकिस्तानविरुद्ध राडा झाला, त्यावरूनच आता कौतुक, टीम इंडियाने सुधारली गेम चेंजर चूक, Video
पाकिस्तानविरुद्ध राडा झाला, त्यावरूनच आता कौतुक, टीम इंडियाने सुधारली गेम चेंजर चूक, Video
advertisement

भारताने दिलेल्या 194 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँडने सावध सुरूवात केली. पॉवर प्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये नेदरलँडची पहिली विकेट गेली. वरुण चक्रवर्तीने मॅक्स ओडवुडला बोल्ड केलं, त्यानंतर आठव्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला दुसरं यश मिळालं. हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर वॉशिंग्टन सुंदरने मायकल लेव्हिटचा बाऊंड्री लाईनवर कॅच पकडला. कॅच पकडत असताना सुंदर बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाईल, असं वाटत होतं, पण त्याने अजिबात न डगमगता उत्कृष्ट कॅच पकडला.

advertisement

पाकिस्तानविरुद्ध खराब फिल्डिंग

advertisement

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला असला तरी भारतीय टीमने 4 कॅच सोडले होते. यातले 2 कॅच तिलक वर्मा, एक कॅच कुलदीप यादव आणि एक इशान किशनने सोडला होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
4 दिवस होते मुक्कामी,शिवाजी महाराजांनी अखेरची लूट केली जालन्यात,इतिहास माहितीये?
सर्व पहा

कुलदीप यादवने बाऊंड्री लाईनवरच सोडलेल्या कॅचमुळे मैदानात राडा झाला होता. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव कुलदीप यादवच्या फिल्डिंगवरून चांगलेच भडकले होते, ज्यामुळे कुलदीप यादवलाही राग आला होता. मॅच जिंकल्यानंतर कुलदीपने सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासोबत हस्तांदोलनही केलं नाही. मैदानात झालेला हा राडा लाईव्ह मॅचमध्ये रेकॉर्ड झाला होता, पण या राड्यानंतर टीम इंडियाने त्यांची फिल्डिंग सुधारली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पाकिस्तानविरुद्ध राडा झाला, त्यावरूनच आता कौतुक, टीम इंडियाने सुधारली गेम चेंजर चूक, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल