'इंडस्ट्रीतील निवडक लोकांमध्ये...', आधी सलमानशी भांड-भांड भांडले, आता त्याच्याच वडिलांसाठी दिग्गज डायरेक्टरची भावनिक साद
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Salim Khan Health Update: आज सलमान खान आणि या दिग्दर्शकात मैत्री असली, तरी एक काळ असा होता की त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता.
advertisement
1/7

बॉलीवूडचे दिग्गज लेखक सलीम खान यांच्या प्रकृतीत आता वेगाने सुधारणा होत असून संपूर्ण चित्रपटसृष्टी सुटकेचा नि:श्वास सोडत आहे. मंगळवारी सकाळी प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
advertisement
2/7
दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी सलीम साहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. या निमित्ताने सलमान खान आणि सुभाष घई यांच्यातील तो जुना किस्सा आणि तो वाद मिटवण्यात सलीम खान यांनी निभावलेली महत्त्वाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
advertisement
3/7
आज सुभाष घई आणि सलमान खान यांच्यात मैत्री असली, तरी एक काळ असा होता की त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. एका मुलाखतीत सलमानने स्वतः कबूल केलं होतं की, एका पार्टीत नशेच्या धुंदीत सुभाष घईंनी सलमानशी गैरवर्तन केलं होतं, ज्याचा राग अनावर होऊन भाईजानने त्यांना थेट थप्पड लगावली होती.
advertisement
4/7
हा वाद जेव्हा वाढला, तेव्हा वडील सलीम खान यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सलमानला समज दिली आणि सुभाष घई यांची माफी मागायला लावली. सलीम साहेबांच्या मध्यस्थीमुळेच बॉलिवूडमधील हा मोठा वाद क्षमला आणि दोन्ही दिग्गज पुन्हा एकत्र आले. म्हणूनच आज सलीम खान आजारी असताना सुभाष घई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
5/7
सुभाष घई यांनी एएनआयला सांगितलं, "सलीम साहेब माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. गेल्या ३०-४० वर्षांपासूनचं आमचं नातं आहे. सलमान तर नंतर आला, पण सगळ्यात सलीम होते. ते या इंडस्ट्रीतील निवडक लोकांमधील आहेत, ज्यांचा मला खूप आदर आहे. सध्या मी त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहे. त्यांची तब्येत चांगली राहो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो कारण ते खूप चांगले व्यक्ती आहेत."
advertisement
6/7
लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी आज जो प्रेस बुलेटिन जारी केला आहे, त्यानुसार सलीम खान यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, पण आता त्यांची तब्येत उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व चाचण्यांचे रिपोर्ट सकारात्मक आले तर उद्या, गुरुवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
advertisement
7/7
मंगळवारी सकाळी ८:३० वाजल्यापासून सलमान खान, अरबाज आणि सोहेल सातत्याने वडिलांच्या सोबतीला आहेत. सलीम खान यांचं ९० वर्षांचं वय पाहता डॉक्टर कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाहीत. मात्र, आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने खान कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी देवाचे आभार मानले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'इंडस्ट्रीतील निवडक लोकांमध्ये...', आधी सलमानशी भांड-भांड भांडले, आता त्याच्याच वडिलांसाठी दिग्गज डायरेक्टरची भावनिक साद