TRENDING:

गोल्ड-सिल्वर ETF मध्ये धुमाकूळ; किंमत आवरण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन, नवे नियम बदलणार खेळ

Last Updated:

Gold And Silver: गोल्ड आणि सिल्वर ETF मधील असामान्य चढ-उतार आणि प्रीमियम ट्रेडिंगच्या पार्श्वभूमीवर सेबीने किंमत नियंत्रणासाठी नवे प्रस्ताव मांडले आहेत. प्राइस बँड आणि बेस प्राइस ठरवण्याच्या सुधारित पद्धतीमुळे गुंतवणूकदारांना अचानक उसळी-घसरणीपासून संरक्षण मिळण्याची शक्यता आहे.

advertisement
मुंबई: अलीकडच्या काही महिन्यांत गोल्ड आणि सिल्वर ETF मध्ये असामान्य चढ-उतार दिसून आले आहेत. बाजारातील प्रत्यक्ष सोन्या-चांदीच्या किमती आणि एक्सचेंजवर ट्रेड होणाऱ्या ETF युनिट्सच्या दरात मोठी तफावत निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सेबीने नियमांमध्ये बदल सुचवले आहेत.
News18
News18
advertisement

2025 मध्ये काही प्रसंगी ETF ची किंमत एका दिवसात तब्बल 21% पेक्षा जास्त वाढल्याची उदाहरणे समोर आली. अशा वेळी गुंतवणूकदार ‘खऱ्या’ किमतीपेक्षा जास्त दराने युनिट्स खरेदी करतात आणि नंतर तोटा सहन करावा लागू शकतो.

सेबीचे दोन महत्त्वाचे प्रस्ताव:

1) नवा प्राइस बँड

बाजार सुरू होताना ETF साठी ±6% असा प्राथमिक प्राइस बँड लागू केला जाईल. जर किंमत या मर्यादेला भिडली, तर 15 मिनिटांचा ‘कूलिंग ऑफ’ ब्रेक दिला जाईल. त्यानंतर बँड 3-3% ने वाढवता येईल. मात्र एका दिवसात एकूण हालचाल ±20% पेक्षा जास्त होणार नाही. यामुळे अचानक उसळी किंवा घसरण यावर नियंत्रण राहील, असे सेबीचे मत आहे.

advertisement

2) बेस प्राइस ठरवण्याची नवी पद्धत

सध्या ETF चा दिवसाचा सुरुवातीचा दर ठरवण्याची पद्धत तुलनेने जुनी मानली जाते. सेबीने सुचवले आहे की मागील दिवसाची सरासरी ट्रेडिंग किंमत किंवा नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) यापैकी योग्य पर्याय आधार म्हणून घ्यावा. त्यामुळे बाजार उघडताच किंमत वास्तवाशी अधिक सुसंगत राहील.

गुंतवणूकदारांना कसा फायदा?

सोन्या-चांदीच्या ETF मध्ये अनेकदा डिमांड जास्त आणि पुरवठा कमी असल्यास ‘प्रीमियम’ वर ट्रेडिंग होते. नव्या चौकटीमुळे ETF चा दर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रत्यक्ष सोन्या-चांदीच्या किमतींशी अधिक जुळता राहील. त्यामुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांना होणारा संभाव्य तोटा कमी होऊ शकतो.

advertisement

ETF म्हणजे काय?

  • ETF (Exchange Traded Fund) हे शेअरप्रमाणे एक्सचेंजवर खरेदी-विक्री करता येणारे फंड असतात.
  • ते एखादा निर्देशांक (निफ्टी, सेन्सेक्स), कमोडिटी (गोल्ड, सिल्वर) किंवा विशिष्ट सेक्टर ट्रॅक करतात.
  • एका ETF मध्ये अनेक शेअर्स किंवा मालमत्ता असू शकतात, त्यामुळे कमी खर्चात विविधीकरण मिळते.
  • बाजार सुरू असताना कधीही खरेदी-विक्री करता येते, म्हणून लिक्विडिटी जास्त असते.
  • advertisement

सध्या सेबीने मांडलेले प्रस्ताव चर्चेसाठी खुले आहेत. अंतिम निर्णयानंतरच नवे नियम लागू होतील. मात्र सोन्या-चांदीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी ही महत्त्वाची घडामोड मानली जाते.

मराठी बातम्या/मनी/
गोल्ड-सिल्वर ETF मध्ये धुमाकूळ; किंमत आवरण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन, नवे नियम बदलणार खेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल