TRENDING:

T20 World Cup : सुपर 8 आधी श्रीलंकेला 440 व्होल्टचा झटका, 'हुकमी एक्का' झाला स्पर्धेबाहेर

Last Updated:
श्रीलंकेला ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना हा नामिबिया विरूद्ध खेळायचा आहे. हा सामना उद्या 19 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/9
सुपर 8 आधी श्रीलंकेला 440 व्होल्टचा झटका, 'हुकमी एक्का' झाला स्पर्धेबाहेर
टी20 वर्ल्डकपच्या सूपर 8 मध्ये श्रीलंका पोहोचली आहे. पण सूपर 8 चे सामने सूरू होण्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे.
advertisement
2/9
श्रीलंकेला ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना हा नामिबिया विरूद्ध खेळायचा आहे. हा सामना उद्या 19 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
3/9
सुपर 8 सामन्याआधी श्रीलंकेच्या गोलंदाजाला दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेबाहेर झाला आहे. हा खेळाडू दुसरी तिसरा कुणी नसून मथिषा पथिराना आहे.
advertisement
4/9
मथिशा पथिराणाच्या वासराच्या (पोटरीच्या स्नायूंना) दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेबाहेर झाला आहे, ईसपीएन क्रिकइन्फोने या संदर्भातली माहिती दिली आहे.
advertisement
5/9
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाथिराणा डाव्या पायाला धरून खाली पडला होता. सामन्यातील चौथा चेंडू टाकल्यानंतर तो पडल्याने पाथिराणाला वेदना होत होत्या. तो खेळात पुढे गोलंदाजी करण्यासाठी परतला नाही आणि मैदानाबाहेर गेला होता.
advertisement
6/9
मिडिया रिपोर्टनुसार, मथिराच्या स्कॅनमध्ये वासराच्या दुखापतीचे निदान झाले आहे, जे बरे होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. त्यामुळे तो वर्ल्डकप बाहेर गेला आहे आणि त्याचा आयपीएलमधील सहभाग धोक्यात आला आहे.
advertisement
7/9
विक्रम राठोर यांनी पाथिराणाच्या दुखापतीची पुष्टी केली आहे. "मला वाटतं त्याला उर्वरित स्पर्धेसाठी अयोग्य घोषित करण्यात आलं आहे. जर त्याला बाहेर काढण्यात आलं तर त्या बातम्या बाहेर येतील असं मला वाटतं. बदली खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर त्यावर अजूनही चर्चा सुरू आहे," राठोड म्हणाले आहेत.
advertisement
8/9
मथिशा पथिरानाने आर्यलंड विरूद्ध 3 ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. तर ओमान विरूद्द त्याने 3 ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरूद्ध तो फक्त 4 बॉल टाकून स्पर्धेबाहेर झाला होता.
advertisement
9/9
श्रीलंकेकडे काही बदली पर्याय आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका आणि बिनुरा फर्नांडो हे पर्याय आहेत, तर श्रीलंका वेगवान गोलंदाज नुवान तुषारालाही खेळवू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सुपर 8 आधी श्रीलंकेला 440 व्होल्टचा झटका, 'हुकमी एक्का' झाला स्पर्धेबाहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल