TRENDING:

Kasuri Methi : कसूरी मेथी कशी बनवायची? ही सोपी पद्धत माहित असेल तर वाचतील पैसे आणि मिळेल ऑर्गॅेनिक चव

Last Updated:
सहसा आपण ही कसुरी मेथी बाजारातून विकत आणतो. पण अनेकदा बाजारात मिळणाऱ्या पाकिटात तिचा मूळ सुगंध उडालेला असतो.
advertisement
1/8
Kasuri Methi : कसूरी मेथी कशी बनवायची? ही सोपी पद्धत माहित असेल तर वाचतील पैसे
डाळ मखनी असो, पनीर बटर मसाला किंवा चटपटीत बटर चिकन... हॉटेलमध्ये गेल्यावर या भाज्यांचा जो एक खास सुवास येतो, तो घरच्या जेवणाला येत नाही अशी तक्रार अनेक गृहिणी करतात. या सुगंधामागचं खरं गुपित आहे. 'कसुरी मेथी'! भाजी तयार झाल्यावर वरून टाकलेली एक चिमूटभर कसुरी मेथी जेवणाची चव आणि सुगंध दोन्ही कैक पटीने वाढवते.
advertisement
2/8
सहसा आपण ही कसुरी मेथी बाजारातून विकत आणतो. पण अनेकदा बाजारात मिळणाऱ्या पाकिटात तिचा मूळ सुगंध उडालेला असतो. अशावेळी भाजीला हवा तसा फ्रेश सुगंध येत नाही, पण जर हीच सुगंधी कसुरी मेथी तुम्ही तुमच्या हाताने घरीच बनवली तर? उन्हाळ्यात किंवा जेव्हा मेथी स्वस्त असते, तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात कसुरी मेथी बनवून वर्षभरासाठी स्टोअर करू शकता. कशी? जाणून घेऊया ही सोपी पद्धत.
advertisement
3/8
कसुरी मेथी बनवण्याची योग्य पद्धत (Step-by-Step)1. ताज्या पानांची निवडकसुरी मेथी बनवण्यासाठी सर्वात आधी ताजी मेथी निवडून घ्या. शक्यतो कोवळी पाने आणि देठ वापरा. पिवळी पडलेली किंवा खराब झालेली पाने निवडून वेगळी करा. त्यानंतर ही पाने स्वच्छ पाण्याने २-३ वेळा धुवून घ्या, जेणेकरून त्यावरील माती निघून जाईल.
advertisement
4/8
2. पाण्याचा निचरा:धुतलेली पाने एका गाळणीत किंवा सुती कपड्यावर काही वेळ ठेवा, जेणेकरून त्यातील सर्व पाणी निथळून जाईल. पाने पूर्णपणे कोरडी होणे महत्त्वाचे आहे.
advertisement
5/8
3. वाळवण्याची 'खास' युक्ती:मेथीची पाने एका स्वच्छ सुती कपड्यावर सुटसुटीत पसरवा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मेथी कधीही थेट कडक उन्हात वाळवू नका. उन्हामुळे मेथीचा हिरवा रंग काळा पडतो आणि तिचा नैसर्गिक सुवासही नष्ट होतो. त्याऐवजी घरामध्येच सावलीत किंवा हवेशीर ठिकाणी मेथी वाळवा.
advertisement
6/8
4. कुरकुरीत होईपर्यंत वाट पाहा:पाने सर्व बाजूंनी व्यवस्थित सुकण्यासाठी दिवसातून एकदा ती हाताने वर-खाली करा. साधारणपणे 2 ते 3 दिवसांत पाने पूर्णपणे सुकून कुरकुरीत होतात. हाताने चुरल्यावर त्याचा सहज चुरा होत असेल, तर तुमची कसुरी मेथी तयार आहे.
advertisement
7/8
वर्षभर कशी साठवाल?ही तयार झालेली कसुरी मेथी एका हवाबंद काचेच्या बाटलीत किंवा डब्यात भरून ठेवा. बाटलीत भरताना तुमचे हात आणि बाटली दोन्ही पूर्णपणे कोरडे असावेत. अशा प्रकारे साठवलेली कसुरी मेथी अनेक महिने तिचा सुगंध टिकवून ठेवते.
advertisement
8/8
बाजारातील कसुरी मेथीपेक्षा घरची मेथी अधिक शुद्ध, ताजी आणि स्वस्त पडते. शिवाय यात कोणतेही कृत्रिम रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्ह नसल्यामुळे ती आरोग्यासाठीही उत्तम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kasuri Methi : कसूरी मेथी कशी बनवायची? ही सोपी पद्धत माहित असेल तर वाचतील पैसे आणि मिळेल ऑर्गॅेनिक चव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल