खरं तर ईशानने पाकिस्तानविरूद्ध वादळी खेळी करून मोठा धुमाकुळ घातला आहे. कारण पाकिस्तानमध्ये ईशान किशनच्या या वादळी खेळीचे प्रचंड कौतुक होत आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस ईशान किशन पाकिस्तानची धुलाई करत होता,त्याचवेळी पाकिस्तानचे चाहते त्याच्याबद्दल गुगलवर अनेक गोष्टी सर्च करत होते. दरम्यान पाकिस्तानचे चाहते जे सर्च करत होते? ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
advertisement
गुगल ट्रेंडने दिलेल्या माहितीनुसार, मॅच दरम्यान पाकिस्तानचे चाहते, ईशान किशनच वय काय आहे?,ईशानच बॅकग्राऊंड काय आहे? त्याची गर्लफ्रेंड/बायको कोण आहे, फॅमिली आणि धर्म असे सगळेच किवर्ड गुगलवर ट्रेंड होत आहेत. या सोबत ईशान किशनची संपत्ती किती आहे? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानी चाहते गुगवलवर सर्च करत आहे.
गुगल ट्रेंडनुसार ईशान किशनची गर्लफ्रेंड कोण आहे? हा प्रश्न गुगलवर खूप ट्रेड करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार ईशानच्या गर्लफ्रेडच नाव आदिती हुंडिया आहे.त्यामुळे पाकिस्तानची 25 कोटी 93 लाख (259.3 Million) जनता ईशानबद्दल या सगळ्या गोष्टी गुगलवर सर्च करतेय.त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांची झोप उडाल्याचे बोलले जात आहे.
