महागड्या अभिनेत्रींपैकी एक, तरीही बाबांकडे मागते पैसे! रिंकू राजगुरूचा पैशांबाबत शॉकिंग खुलासा, पहिल्या पगारातून घेतलेली ही खास वस्तू
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rinku Rajguru Finance: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिंकूने तिच्या वैयक्तिक आर्थिक नियोजनाबद्दल जे काही सांगितलंय, ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
advertisement
1/7

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'ने मराठी सिनेसृष्टीचा इतिहास बदलला आणि १०० कोटींची कमाई करून बॉलिवूडलाही घाम फोडला. या चित्रपटाने केवळ रेकॉर्डच मोडले नाहीत, तर आर्ची आणि परश्या या दोन साध्या चेहऱ्यांना रातोरात सुपरस्टार बनवलं.
advertisement
2/7
विशेषतः 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरू आज घराघरात पोहोचली. सध्याच्या घडीला रिंकू एका मोठ्या उंचीवर असली, तरी आजही ती जमिनीवर पाय घट्ट रोवून उभी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिंकूने तिच्या वैयक्तिक आर्थिक नियोजनाबद्दल जे काही सांगितलंय, ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
advertisement
3/7
रिंकूने 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या साध्या राहणीमानाचा प्रत्यय दिला. ती म्हणाली, "मला पैसे जवळ ठेवायला अजिबात आवडत नाही. एखाद्या प्रोजेक्टसाठी मला किती मानधन मिळतं, हे एकदा ठरलं की ते सर्व पैसे मी थेट बाबांकडे किंवा पूजाकडे सोपवून देते. माझ्या अकाऊंटवर किती शिल्लक आहे, हे मला आजही माहीत नाही आणि ते जाणून घेण्याची मला इच्छाही नसते."
advertisement
4/7
रिंकूने पुढे एक मजेशीर गोष्ट सांगितली की, तिने 'जी-पे' (GPay) सुद्धा अगदी अलीकडेच वापरण्यास सुरुवात केली आहे. त्याआधी तिच्याकडे स्वतःचे पैसे नसायचे. काही खर्च करायचा असला की ती पूजा किंवा बाबांना सांगायची.
advertisement
5/7
ती म्हणते, "मला कधीच पैशांचा विचार करायला आवडला नाही. बाबा मला नेहमी म्हणतात की आर्थिक व्यवहार शिकून घे, पण मी त्यांना सांगते, बघू नंतर कधीतरी. मला जेव्हा खरंच वाटेल की आता गरज आहे हे सर्व माझ्या हातात घ्यायची, तेव्हा मी घेईन."
advertisement
6/7
आजच्या युगात जिथे प्रत्येकजण गुंतवणुकीच्या मागे धावतोय, तिथे रिंकूचा आपल्या पालकांवरचा विश्वास कौतुकास्पद आहे. रिंकू म्हणते, "लहानाचं मोठं करताना आई-बाबांनी कधी पैशांचा हिशोब केला का? मग आता मी तरी का करू? मला पूर्ण खात्री आहे की ते माझा एक रुपयाही स्वतःसाठी वापरत नाहीत. पुण्यातील घर घेतानाही त्यांनी मला विचारलं, मी म्हटलं घ्या."
advertisement
7/7
'सैराट'चं शूटिंग झालं तेव्हा रिंकू शाळेत होती. तिच्या आयुष्यातील पहिली कमाई ही या चित्रपटातूनच मिळाली होती. एखादी मुलगी आपल्या पहिल्या पगारातून दागिने किंवा महागडे कपडे घेईल, पण रिंकूने काहीतरी वेगळंच केलं होतं. तिने सांगितलं, "सैराटमधून मला जो पहिला पगार मिळाला, त्यातून मी माझी दहावीची पुस्तकं विकत घेतली होती."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
महागड्या अभिनेत्रींपैकी एक, तरीही बाबांकडे मागते पैसे! रिंकू राजगुरूचा पैशांबाबत शॉकिंग खुलासा, पहिल्या पगारातून घेतलेली ही खास वस्तू