TRENDING:

अन् तिने महागुरूंच्या हातावर 500 रुपयाची नोट ठेवली, सचिन पिळगांवकरांनी सांगितला किस्सा

Last Updated:
Sachin Pilgaonkar : अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम करून लोख रुपये कमावले पण त्यांना मिळालेले ते 500 रुपये आजही त्यांच्या स्मरणात आहेत.
advertisement
1/8
अन् तिने महागुरूंच्या हातावर 500 रुपयाची नोट ठेवली,पिळगांवकरांनी सांगितला किस्सा
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर गेली अनेक वर्ष मराठी तसंच हिंदी मनोरंजन विश्वात काम करत आहेत. त्यांच्या कामाचं कौतुक बालपणी राष्ट्रपतींच्या हस्ते झालं आहे. सचिन पिळगांवकर फक्त अभिनयच नाही उत्तम गाणी गातात, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या सगळ्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत.
advertisement
2/8
सचिन पिळगांवकर यांनी फक्त स्वत: सिनेमात काम केलं नाही तर इतरांनी देखील काम करण्याची संधी दिली. सचिन पिळगांवकर खूप दयाळू आणि मदत करणाऱ्या स्वभावाचे असल्याचे अनेक किस्से अनेक कलाकारांकडून ऐकायला मिळाले आहेत.
advertisement
3/8
इतकंच नाही तर एखाद्याचं काम आवडल्यास ते स्वत: जाऊन त्याचं कौतुकही करतात. एकापेक्षा एक या रिअलिटी शोमध्येही वेळोवेळी पाहायला मिळालं होतं. महागुरू अशी ओळख एकापेक्षा एक या शोमुळे सचिन पिळगांवकर यांना मिळाली.
advertisement
4/8
या शोमध्ये स्पर्धकांचा परफॉर्मन्स आवडला की सचिन पिळगांवकर खुर्चीवर उठायचे 100 रुपयांची नोट काढून त्याला द्यायचे. त्यांची ही कौतुक करण्यासाठी पद्धत आजही तितकीच प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सचिन पिळगांवकर यांचं काम पाहून एका महिलेनं कौतुक करत त्यांच्या हातावर 500 रुपयांची नोट ठेवली होती. सचिन यांनी स्वत: हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. 
advertisement
5/8
सचिन पिळगांवकर म्हणाले होते, "मी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्पलेक्समधून बॅडमिंटन खेळून बाहेर पडत होतो. तिथे लहान मुलांना अॅरोबिकसाठी आणणाऱ्या आया. त्यातील एक आई होती. अतिशय लहान मुलगा होता तिचा. मला वाटतं ती पस्तिस, चौतीस वर्षांची असेल. तिने मला बघितलं आणि म्हणाली, सचिन जी, नमस्कार. तिने तिचं नाव सांगितलं."
advertisement
6/8
 "ती म्हणाली, तुमचं काम मी बघत आलेय. मला तुमचं काम खूप आवडलं. मी तुमच्या लहानपणीचे पिक्चर्सही युट्यूबवर पाहिले मला खूप आवडले. तुम्ही कट्यार काळजात घुसलीमध्ये काय काम केलं. ती म्हणाली, तुमचं काम मी बघत आलेय. मला तुमचं काम खूप आवडलं. मी तुमच्या लहानपणीचे पिक्चर्सही युट्यूबवर पाहिले मला खूप आवडले. तुम्ही कट्यार काळजात घुसलीमध्ये काय काम केलं."
advertisement
7/8
"तुम्ही इतके वर्ष हे करत आहात, मला तुम्हाला काही तरी द्यायचं आहे म्हणून तिने पर्स उघडली आणि 500 रुपये काढले. तिने मला दिले आणि म्हणाली, हे तुम्ही घ्या, माझ्याकडे तुम्हाला द्यायला दुसरं काही नाहीये."
advertisement
8/8
सचिन पिळगांवकर यांचा हा हृदयस्पर्शी किस्सा सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा एक किस्सा नाही तर सचिन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीतील त्यांचे अनेक अनुभव मुलाखतींमध्ये सांगितले आहेत. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अन् तिने महागुरूंच्या हातावर 500 रुपयाची नोट ठेवली, सचिन पिळगांवकरांनी सांगितला किस्सा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल